घटना

20 हजार रुग्णांचा आकडा पार, आता लॉकडाऊनचं काय होणार

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येंचा उद्रेक झाला आहे. एकाच दिवसात 20 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास लॉकडाऊन लागू शकतो.

Mumbai Lockdown News : मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या (Corona patients) 20 ते 30 टक्क्यांनी वाढत आहे. मुंबईत 20 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात वीकेंड लॉकडाऊन होण्याची शक्यात आहे.

मुंबईत लॉकडाऊन लागणार का?

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येंचा उद्रेक झाला आहे. एकाच दिवसात 20 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास लॉकडाऊन लागू शकतो. असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं. त्यावर आज महापौर किशोरी पेडणेकरांनी स्पष्टीकरण दिले आहे. सध्यातरी पूर्ण लॉकडाऊन लागू केला जाणार नसून मिनी लॉकडाऊनवर विचार केला जातोय, अशी माहिती महापौर यांनी दिली आहे.

काय होणार शक्यता

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करत आहेत. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईत रुग्णांची संख्या धोक्याची पातळी ओलांडताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंधाबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो.

मुंबईतील वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मिनी लॉकडाऊन योग्य ठरू शकतो, वाढती रुगण संख्या पाहता निर्बंध अधिक कडक करावे लागतील, असा इशाराही महापौर किशोरी पेडणेकरांनी दिला आहे.

मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही त्यामुळे घाबरण्यापेक्षा काळजी घ्या. असे महापौर म्हणाल्या, 100 पैकी 80 टक्के लोक हे नियमांचं पालन करत आहेत; पण 20 टक्के नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे जर असचं नागरिक गर्दी करत राहिले, तर येत्या काळात लॉकडाऊन लावण्यात येऊ शकतो, असे संकेतही किशोरी पेडणेकरांनी दिले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments