
शनिवारी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना एक अतिशय गोड भेट दिली आहे .चार दिवसांपूर्वी हिवाळी अधिवेशनात 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली होती.मुंबईकरांनी या निर्णयाचेअतिशय आनंदात स्वागत केले.
मुंबईच्या भायखळा स्थित असलेल्या मंदार निकेतन रहिवाशी मंडळाचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी या निर्णयाबाबत शासनाला पत्रात लिहले आहे की , ” हजारो भाडेकरू म्हाडाच्या 180 चौरस फुटाच्या गाळ्यात राहतात आणि म्हाडाला भाडे भरतात.आता सरकारने मालमत्ता कर रद्द केला आहे.त्या मुळे हा लाभ म्हाडाने थेट भाडेकरुंना उपलब्ध करून दिला पाहीजे पर्यायाने जेवढी मालमत्ता कर म्हाडा भरत होते तेवढी सवलत म्हाडाने भाडेकरूंना द्यावी. पर्यायाने म्हाडाने भाडे कमी करावे.
जर म्हाडा ने हा निर्णय घेतला तरच म्हाडाच्या भाडेकरूना वरील निर्णयाचा लाभ मिळू शकतो अन्यथा या निर्णयाचा म्हाडाच्या भाडेकरूंना काहीही फायदा होऊ शकत नाही. तरी या बाबत म्हाडाने तातडीने निर्णय घेऊन म्हाडा भाडेकरूंचे भाडे कमी करावे.”
हे हि वाचा: