अर्थकारण

Mumbai Penguin : मुंबईपेक्षा गुजरातमध्ये पेंग्विन बाळगण्याचा खर्च सर्वाधिक, असं का?

मुंबईतील पेंग्विन पाहण्याच्या तिकिटाचे दर 25 ते 30 रुपये आहे. मात्र अहमदाबादमधील पेंग्विन पाहण्यास 300 रुपये मोजावे लागणार आहेत.

Mumbai Penguin : मुंबईतील वीरमाता जिजाबाई प्राणीसंग्रहालयानंतर गुजरातच्या सायन्स सेंटरमध्ये आता पेंग्विनस् पाहायला मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वीच पेंग्विन पार्कचे उद्घाटन गुजरातचे शिक्षण मंत्री जीतुभाई वाघानींच्या हस्ते करण्यात आले होते. या पार्कच्या पेंग्विन प्रदर्शनासाठी तब्बल 257 कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. गुजरातचे लक्ष्य ऑस्ट्रेलियन किंवा न्यूझीलंडचे पेंग्विनस् आणण्याचे होते पण अखेर त्यांनी विचार बदलून आफ्रिकन प्रजातीचे पेंग्विनस् आणले. हे पेंग्विनस् प्रामुख्याने निमोबिया आणि दक्षिण आफ्रिकेत आढळतात. ( Is there any penguins in India? )

एकूण 5 आफ्रिकन पेंग्विनस् अहमदाबादमध्ये आणले आहेत. पेंग्विनची ही प्रजाती फार दुर्मिळ असल्याने त्यांची विषेश काळजी घेतली जात आहे. मुंबईच्या राणीबागेतील पेंग्विन प्रकल्पासाठी एकूण 17 कोटींचा खर्च करण्यात आला होता. मुंबईतील पेंग्विनस् प्रामुख्याने दक्षिण कोरीया देशातून मागवण्यात आले होते. हे पेंग्विनस् हमबोल्डट् प्रजातीचे आहेत. ( Are there penguins in Science City Ahmedabad? )

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्रात सर्व पाट्या मराठीतच असल्या पाहिजेत ,” असे नवे नियम लागू केले होते. यावर भाजपा नेते चित्रा वाघ यांनी मुंबईतील पेंग्विनच्या  ऑस्कर नावावर आक्षेप घेतला होता. पण या वेळी पेडणेकरांनी ट्विट मार्फत नावाच्या राजकारणावर उत्तर दिले आहे की, “महाराष्ट्राची राजधानी मुंबईनंतर आता शेजारचं राज्य गुजरातमध्ये (अहमदाबाद) देखील पेंग्विन पार्क तयार करण्यात आले आहे. अहमदाबाद, गुजरात या ठिकाणी एकूण 5 अफ्रिकन पेंग्विन आहेत. त्यांची नावं सिमोन, पुंबा, नेमो, मुशू आणि स्वेन अशी आहेत.” ( What is the price of Penguin in India? )

मुंबईतील पेंग्विन पाहण्याच्या तिकिटाचे दर 25 ते 30 रुपये आहे. मात्र अहमदाबादमधील पेंग्विन पाहण्यास 300 रुपये मोजावे लागणार आहेत. ( Which Indian zoo has penguins? )

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments