फेमस

Mumbai Winter : मुंबई बर्फ का पडतोय?

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आहे. यामुळे गेल्या काही वर्षांतील थंडीने उच्चांक गाठला असल्याचं मत अनेक अभ्यासकांनी मांडलं आहे.

Mumbai Winter : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आहे. यामुळे गेल्या काही वर्षांतील थंडीने उच्चांक गाठला असल्याचं मत अनेक अभ्यासकांनी मांडलं आहे. ही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. इतकंच नाही तर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागात पाऊस पडणार असल्याचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये थंडीची लाट कायम राहणार आहे. मात्र या सगळ्याचा परिणाम मुंबईकरांवर भलताच होत असल्याचं दिसून येत आहे.


मुंबईमध्ये वाढलेल्या थंडीमुळे अनेक मिम्सकरांनी आपल्या कलेचं प्रदर्शन करण्यास सुरुवात केलं आहे. मात्र ते प्रदशन इतक्या पातळीपर्यंत पोहोचलं आहे, की अनेक मुंबईकरही त्याचा आनंद घेत आहेत.

मुंबईमध्ये बर्फ पडत असल्याचे अनेक फोटो एडिट करून ट्विटरवर शेअर केले जात आहेत. काहीजण दादर रेल्वे स्टेशनमध्ये बर्फ पडत असल्याचे फोटो टाकून मजा घेत आहेत, तर काहीजण उल्हासनगरपर्यंत जाऊन पोहोचले आहेत.

या सगळ्या मुंबईकरांना आपल्या ट्विटच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची आहे की मुंबईमध्ये अचानक एवढी थंडी वाढली आहे आणि ती थंडी त्यांना एखाद्या बर्फाळ ठिकाणासारखी वाटत आहे. काहीजण तर मिम्स बनवण्यात इतके तरबेज आहेत की त्यांनी थेट दादर स्टेशनलाच बर्फाळ प्रदेशात नेऊन ठेवलय.

त्यामुळे मुंबईकरांमध्ये थंडीमुळे जरी निगेटिव्ह वातावरण पसरलं असलं, तरी मात्र या थंडीचा ट्विटरवर मनमुराद आनंद घेतला जात आहे, हे नक्की.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments