फेमस

1 लाख रुपयांच्या पानाची चर्चा, माहिमचं हे पान होतय जगात फेमस

वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई ही अनेक पानाच्या प्रकारांसाठीही प्रसिद्ध आहे. तुम्ही इथल्या काही मोहल्ल्यांमध्ये फिरलात, तर तुम्हाला अनेक ठिकाणच्या पानस्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारचे पान खायला मिळतील.

The Paan Story : आपल्या मुंबईमध्ये कुठल्या गोष्टीची कमी नाही. कधी कुठली गोष्ट फेमस होईल, हेही सांगता येत नाही. अशीच एक गोष्ट सध्या मुंबईमध्ये सर्वाधिक फेमस होत आहे, ती म्हणजे मुंबईच्या माहीममधील तब्बल 1 लाखांचे पान.

वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई ही अनेक पानाच्या प्रकारांसाठीही प्रसिद्ध आहे. तुम्ही इथल्या काही मोहल्ल्यांमध्ये फिरलात, तर तुम्हाला अनेक ठिकाणच्या पानस्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारचे पान खायला मिळतील. मात्र अशाच एका खवय्याने चक्क पानाची टपरी नाही तर पान शॉप सुरु केलय, असं आपण म्हणू शकतो. आता या पानशॉपमध्ये काय खास आहे आणि 1 लाख रुपयांच्या पानात इतकं काय खास आहे, हेच आपण आज समजून घेणार आहोत.

या शॉपचं नाव आहे ‘दी पान स्टोरी’ या शॉपमध्ये हजारो प्रकारचे पानाचे प्रकार आपल्याला पाहायला आणि खायला मिळतात. या शॉपमध्ये मिळणार प्रत्येक पान हे तंबाखू फ्री आहे, असं या शॉपचे मालक नौशाद शेख म्हणतात. नौशाद शेख यांनी नागरिकांच्या आवडीनुसार आपल्या शॉपची डिझाईन केली आहे. लोक फक्त पान खायला येत नाही, तर पान खाताना नागरिकांना येणारा अनुभव खूप वेगळा असतो, असं शेख म्हणतात. या शॉपमध्ये किमान 300 प्रकारचे पान मिळतात.

एक लाखाच्या पानाचे ना आहे ‘फ्रॅग्रंस ऑफ लव्ह’. हे पान खास करून नव दाम्पत्यासाठी बनवलं असल्याचं शेख म्हणतात. लग्नाच्या पहिल्या रात्री पती आणि पत्नीने या पानाचा आस्वाद घ्यावा, अशाप्रकारे या पानाची रचना केली आहे.

पॅकेजमध्ये काय असतं तेही समजून घेऊ

या संपूर्ण पॅकेजचं नाव आहे फ्रॅग्रंस ऑफ लव्ह’. याचा अर्थ प्रेमाची निशाणी. हे पान दोन जोडप्यांनी खावं, असं डिझाईन केलं आहे. या पॅकेजमध्ये दोन पान, अत्तराची बाटली, केशर, गुलाबी फुलांच्या पाकळ्या आणि सोबतच प्रेमाची निशाणी असलेला ताजमहाल मिळणार आहे. ताजमहालाची रचनाही एकदम खास असल्याने याकडे अनेक लोक आकर्षित होतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments