
मुंबईच्या जिया राय हिची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारसाठी क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे. 13 वर्षीय जिया राय दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वॉटर पॅरास्विमींग आणि ओपन वॉटर स्विमींगमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापीत केला आहे. ( Mumbai’s Sagar Kanye will be honored by the Prime Minister)
जिया ही लहाणपणापासूनच स्वमग्नग्रस्त आहे. जीयाचा आजार दूर हिण्यासाठी तिला पोहण्यास शिकायला टाका, असा सल्ला ती पाच वर्षाची असताना डॉक्टरांनी तिच्या आई वडिलांना दिला होता. त्यानुसार ती केवळ पोहणे शिकलीच नाही तर एकाहून एक विक्रम करून या विक्रमांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद केली.
तिने केलेल्या अफलातून कामगिरीमुळे जियाचा प्रजासत्ताक दिनी ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’ पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे, स्वमग्नता अर्थात ऑटिझम असलेल्या व्यक्तिच्या कार्यक्षमतेवर कुणालाही शंकाच येईल. मात्र, 10 वर्ष कठोर मेहनत करून हे यश मिळविले आहे, मुंबईतील 11 वर्षीय जिया राय हिने हा समज खोटा ठरवला आहे. जियाचे वडील मदन राय हे नौदलात नाविक आहेत, यामुळे पाण्याबाबत तिला लहानपणापासूनच ओढ होती, असे मदन राय यांनी सांगितले.
जियाने एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर साडे तीन तासात पोहून पार करत विक्रमाची नोंद केली आहे. जियाला ऑटिझम आहे, तरीही ती उत्तम जलतरणपटू बनली आहे. जियाला बोलता येत नाही, ती स्वतः स्वमग्न असते, जिया अपंग असताना ही तिने धडधाकट असलेल्या लोकांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. फक्त तेरा वर्षाची जीया हिने पोहण्यात विश्वविक्रम केलाय. त्यामुळे मुलांमध्ये जे कमी आहे ते न पाहता, ते काय करू शकतात याकडे लक्ष द्यावे असे वडील सांगतात. जियाने केलेल्या अफलातून कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हे ही वाचा:
- कोरोनाकाळातही लग्नाची घाई? कोणत्या महिन्यात किती मुहूर्त? पाहा एका क्लीकवर…
- Padma Award : पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री यामध्ये काय आहे फरक?
- देशाच्या सुरक्षेत महाराष्ट्र पोलीस ‘नंबर वन’; 51 पदकं केली नावावर