
कोणतेही सरकारी काम बोलले की सर्वांनाच सर्वप्रथम लक्षात येतात ती प्रशासनाने निश्चित केलेली सरकारी कागदपत्रे. या कागदपत्रांशिवाय आपले कोणतेही सरकारी काम पूर्ण होत नाही. मग या कामामध्ये कोणत्याही गोष्टीची माहिती काढणे असो, कोणती सरकारी कामाची नोंद करणे असो, जमिनीची कामे असो, सरकारी नोकरी साठीही अर्ज भरण्यासाठी खूप सारी कागदपत्रे तर वेगवेगळे अर्ज भरावे लागतात. मात्र आता सरकारच्या याच अधिकाऱ्यांनाही असा अर्ज भरावा लागतोय. हा अर्ज एवढा तेवढा नसून 24 पानांचा आहे. 24 पानांचा हा अर्ज भरताना हे सरकारी अधिकारी हैराण झाले आहेत.
(Now government employees will have to fill up a 24 page questionnaire)
मात्र हा भलामोठा 24 पानांचा अर्ज या सरकारी अधिकाऱ्यांना कशाबद्दल भरावा लागतोय?
तर या अधिकाऱ्यांच्या ई-सेवा पुस्तिकेचे काम सरकारने सुरू केले आहे. त्यासाठीच आयएएस अधिकाऱ्यांची माहिती घेण्यात येत आहे. त्यासाठी ही 24 पानांची प्रश्नावली भरावी लागत आहे. ही प्रश्नावली भरताना हे अधिकारी कंटाळले आहेत.
मग या 24 पानांच्या प्रश्नावलीमध्ये आहे तरी नक्की काय?
या प्रश्नावलीमध्ये हो किंवा नाही या प्रकारच्या प्रश्नांचा समावेश आहे. तसेच वैयक्तिक, शैक्षणिक, वैवाहिक, आरोग्यविषयक, नोकरीविषयक माहिती यांचा समावेश आहे. तसेच राजकीय बाबींचा ही समावेश आहे. राज्यघटनेची शपथ, गोपनीयतेची शपथ अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश या प्रश्नावलीमध्ये आहे.
हे हि वाचा: