Padma Award : पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री यामध्ये काय आहे फरक?
पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कारांमध्ये नेमका काय फरक असतो? हे आपण आज समजून घेणार आहोत.

Padma Award : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस 2022 वर्षाच्या पद्म (padma award) पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 128 जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, कल्याण सिंह आणि राधेश्याम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारही जाहीर झाला आहे. मात्र या पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कारांमध्ये नेमका काय फरक असतो? हे आपण आज समजून घेणार आहोत.
पद्मविभूषण
पद्म पुरस्कारांमध्ये हा सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतरत्ननंतर हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील असाधारण आणि उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो. पुरस्कारामध्ये 1-3/16 इंच आकारमानाचा कांस्य बॅच दिला जातो. ज्याच्या मध्यभागी कमळाचे फूल आहे. या फुलाच्या वर-खाली देवनागरी लिपीत पद्मविभूषण लिहिलेले आहे. या बॅजच्यामागे अशोक चिन्ह बनवले आहे. हा पुरस्कार विविध क्षेत्रातील विशिष्ट आणि उल्लेखनीय सेवेसाठी देण्यात येतो. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या सेवांचाही समावेश होतो.
पद्मभूषण
पद्म पुरस्कारांमध्ये पद्मभूषण हा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. तसेच हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. या सन्मानामध्ये 1-3/16 इंच आकाराचा कांस्य बॅज दिला जातो. त्यावर डिझाईन असते. कमळाच्या फुलाच्या वर-खाली पद्मभूषण लिहिले आहे. हा सन्मान कोणत्याही क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि उल्लेखनीय तसेच उच्च श्रेणीतील प्रतिष्ठित सेवेसाठी दिला जातो.
पद्मश्री
पद्मश्री हा पुरस्कार भारताच्या नागरिक पुरस्कारामधील पदानुक्रमे चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. त्याच्याआधी भारतरत्न पद्मविभूषण आणि पद्मभूषण यांचे स्थान आहे. पद्म आणि श्री हे शब्द देवनागरी भाषेतून घेतले गेले आहेत.
हेही वाचा: