अर्थकारण

Railway Budget 2022 : रेल्वेचे तिकीट महागणार? बजेट 2022 चा मुंबईकरांना फटका बसणार?

1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशवासियांचे त्याकडे लक्ष लागून आहे.

Railway Budget 2022 : येत्या अर्थ संकल्पाचा रेल्वेच्या सोईसुविधांपासून रेल्वेच्या प्रवाशावरही परिणाम होणार आहे. कोरोनामुळे रेल्वेच्या तिकिटांमध्य वाढ होणार का, की आहे त्याच तिकीटांवर येतं वर्ष सरणार आहे, यावर सामान्य नागरिकांचे लक्ष असणार आहे. रेल्वे भाड्यात सूट मिळणार का, मालवाहतुकीच्या भाड्यात बदल होणार का? गाड्यांची संख्या वाढणार का? अशा अनेक गोष्टी प्रवाशांच्या समोर आहेत.

तज्ज्ञांचं मत काय?

तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोना काळात मुंबई लोकलसह इतर रेल्वेला मोठा फटका बसला आहे. तरीही रेल्वे तिकीट, मालवाहतुकीचे दर किंवा प्रवासी भाड्यात कोणताही बदल होणार नाही, असं मत तज्ज्ञांचं मत आहे. कारण रेल्वेला जरी मोठं नुकसान झालं असलं तरी भाड्यात शिथिलताही मिळणार नाही किंवा कोणतीही वाढ होणार नाही, अशी माहिती आहे. रेल्वेला झालेला तोटा भरून काढण्यासाठी प्रवासी भाड्याऐवजी रेल्वे अन्य उपाययोजना करून तो तोटा भरून काढू शकेल, अस अनेकांकडून म्हटलं जात आहे. सध्या वाढणाऱ्या रेल्वेच्या अनेक कामांमुळे रेल्वे बजेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या एका वर्षात 26 हजार 338 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. नव्या रेल्वे गाड्यांची घोषणा, हायस्पीड रेल्वे नेटवर्कबाबतची घोषणा, देशातील 500 रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन करण्याची घोषणा, लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अॅल्युमिनियमपासून बनवलेले डबे बसवण्याची घोषणा आणि गाड्यांचा वेग वाढवण्याची घोषणाही यावेळी होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments