लोकल

Railway Station : लोकल स्टेशन, टर्मिनस, सेंट्रल आणि जंक्शन यामध्ये फरक काय?

भारतीय रेल्वे अंतर्गत 92 हजार 81 किलोमीटर रेल्वे रुळाचे जाळे पसरले आहे. यामध्ये 66 हजार 666 किलोमीटरचे अंतर व्यापले जाते.

Railway Station : भारतीय रेल्वे अंतर्गत 92 हजार 81 किलोमीटर रेल्वे रुळाचे जाळे पसरले आहे. यामध्ये 66 हजार 666 किलोमीटरचे अंतर व्यापले जाते. यामधून जवळपास 22 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. भारतीयांना प्रवास करता यावा यासाठी 7 हजार 216 स्थानके वेगवेगळ्या भागात आहेत. यामध्ये स्थानक, टर्मिनस, सेंट्रल आणि जंक्शन असे विभाग पडतात.

प्रवाशांच्या चढण्या-उतरण्याकरिता रेल्वेगाड्या थांबतात. रेल्वे स्थानकांमध्ये साहित्य चढवून-उतरवून घेण्याची देखील सोय असते. साधारणपणे रेल्वे स्थानकांमध्ये एक वा अनेक फलाट असतात, ज्यामुळे एका स्थानकावर एकाच वेळी अनेक गाड्या थांबू शकतात. रेल्वे स्टेशनवर तिकीट विक्री, प्रतिक्षाखोली, उपहारगृहे, स्वच्छतागृहे इत्यादी अनेक सोयी असतात. (Why railway station is called junction)

जी स्थानके रेल्वेमार्गाच्या सर्वात शेवटी असतात त्यांना, टर्मिनस किंवा टर्मिनल असे म्हणतात. म्हणजेच कुर्ल्याजवळील लोकमान्य टिळक टर्मिनस. तसेच ज्या स्थानकांमध्ये एकापेक्षा अधिक रेल्वेमार्ग येऊन मिळतात, त्यांना जंक्शन म्हणतात. म्हणजेच दादर जंक्शन, कल्याण जंक्शन, भुसावळ जंक्शन. विशेषतः युरोपमध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी आणि उपनगरी रेल्वेगाड्यांसाठी वेगळी स्थानके असतात. (What is difference between station and terminal?)

भारतात लांब पल्ल्याच्या आणि उपगनरी रेल्वेंसाठी एकाच स्थानकामधील वेगळे फलाट वापरण्यात येतात. मात्र मुंबईतील मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी आणि उपनगरी रेल्वेगाड्यांसाठी दोन वेगळी स्थानके आहेत. यामुळे मुंबई सेंट्रलचे वैशिष्ट्य देखील वेगळं आहे. सेंट्रल म्हणजे हे स्टेशन त्या शहरातील सर्वात जुने स्टेशन असते, सोबतच त्या शहरातील सर्वात महत्वाचे स्टेशन या स्टेशनला मानलं जात. (What is difference between junction and terminus?)

या स्टेशनवरून बऱ्याच रेल्वे गाड्यांची धावफल सुरू असते. तेही बाकी स्टेशनपेक्षा जास्त. आणि जरुरी नाही की ज्या शहरात एकापेक्षा जास्त स्टेशन आहेत, तिथे सेंट्रल स्टेशन असलेच पाहिजे. भारतातील दिल्ली शहरात बरेच स्टेशन आहेत; पण दिल्लीमध्ये कोणतेही सेंट्रल स्टेशन नाही. भारतात एकूण देशात एकूण 5 सेंट्रल स्टेशन आहेत. यामध्ये मुंबई सेंट्रल (Mumbai Central), चेन्नई सेंट्रल (Chennai Central), त्रिवेंदम सेंट्रल (Trivandrum Central), मैंगलोर सेंट्रल (Mangalore Central), कानपूर सेंट्रल (Kanpur Central) यांचा समावेश आहे. (What is the junction station?)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments