blogफेमस

Ratan Tata Marriage : रतन टाटांनी आयुष्यभर लग्न का केलं नाही, सगळ्यात मोठी कहाणी

यामुळेच त्यांचे अनेक कर्मचारी त्यांच्या सोबत आयुष्यभर टिकून राहतात, रतन टाटा यांच्याशी एकदा एक व्यक्ती जोडली की ती आयुष्यभर कधीच सोडून जात नाही, याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा प्रमाणीकपणा.

Ratan Tata Marriage : देशासह संपूर्ण जगामध्ये एक नाव पूर्ण आदराने घेतलं जातं, ते म्हणजे रतन टाटा यांचं. टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा म्हणून रतन टाटांची ओळख आहे. रतन टाटा हे दुसऱ्या एका गोष्टीमुळे ओळखले जातात, ते म्हणजे त्यांच्या साधेपणामुळे. याच साधेपणामुळे आणि त्यांच्या वागणुकीमुळे रतन टाटा हे हजारो तरुणांसह लाखो उद्योजकांचे आदर्श आहेत. ( Ratan Tata Marriage: The biggest story of why Ratan Tata never got married )

रतन टाटा हे नेहमी त्यांच्या उद्योग संकल्पनांमुळे प्रसिद्ध असतात. त्यांच्या व्यवसायात होणारी प्रगती, त्यांच्या कर्मचार्यांसोबत त्यांची असलेली संगत अशा अनेक गोष्टी तुमच्या समोर आल्या असतीलच, मात्र एक गोष्ट तुमच्या समोर कधीच आली नसेल, ती म्हणजे रतन टाटांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात लग्न का केलं नाही. याच गोष्टीची माहिती आम्ही आज देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

रतन टाटा यांनी लग्न न करण्याची अनेक कारणे सांगितली जातात. त्यांचा व्यवसाय, त्यांचे नातेवाईक, त्यांची आज्जी, पण असच एक कारण आाता समोर येत आहे. रतन टाटा हे एकदा लॉस एंजेलिसमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने गेले होते. तिथे ते एका अमेरिकन मुलीच्या प्रेमात पडले. त्या मुलीच्या घरच्यांनाही या दोघांच्या नात्याबद्दल कोणतीच तक्रार नव्हती. मात्र त्यांच्या आयुष्यात अशी एक गोष्ट घडली की त्या नात्याचा शेवट झाला.

रतन टाटांनी एकदा त्या तरुणीला लग्नाबद्दल प्रपोज केलं. त्यावेळी तरुणीने होकारही दिला होता, मात्र अशातच रतन टाटा यांच्या आज्जी एका आजाराने ग्रस्त झाल्या. त्यामुळे टाटांना अचानक भारतात परतावं लागलं. सोबत येताना संबंधित तरुणीला त्यांनी आपल्यासोबत येण्यास सांगितलं, मात्र त्यावेळी सुरु असलेल्या इंडो – चायना युद्धामुळे तरुणीच्या घरच्यांनी तिला भारतात येण्यास रोखलं. फक्त इतकच नाही, तर टाटा इकडे आपल्या आज्जीची देखभाल करत असताना, तिकडे लॉस एंजेलिसमध्ये संबंधित तरुणीचं त्यांच्या आईवडिलांनी दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून दिलं. ही गोष्ट रतन टाटांना समजली.

या गोष्टीमुळे रतन टाटांना धक्का बसला असला तरी त्या तरुणीला दिलेलं वचन त्यांनी आयुष्यभर पाळलं. लग्न करेन तर तुझ्याशीच अशा वचनामुळे रतन टाटांनी अजूनपर्यंत लग्न केलं नाही. त्यांनी दिलेल्या वचनाचे अनेक किस्से तुम्हाला अनेक ठिकाणी ऐकायला किंवा पाहायला मिळतील.

असं म्हटलं जातं की रतन टाटा यांनी एकदा वचन, शब्द दिला तर तो शब्द ते नेहमी पाळतात. यामुळेच त्यांचे अनेक कर्मचारी त्यांच्या सोबत आयुष्यभर टिकून राहतात, रतन टाटा यांच्याशी एकदा एक व्यक्ती जोडली की ती आयुष्यभर कधीच सोडून जात नाही, याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा प्रमाणीकपणा.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments