Uncategorized

Republic Day : देशप्रेम दाखवण्यासाठी गाडीवर झेंडा लावताय? तुमच्यावर होऊ शकते कारवाई…

भारतीय ध्वज संहितेनुसार, वाहनांवर ध्वज लावण्याचा अधिकार काही ठराविक लोकांनाच देण्यात आला आहे, याशिवाय जर कोणी वाहनांवर झेंडा लावला तर त्याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई होऊ शकते.

राष्ट्रीय सण जवळ येताच, प्रत्येक राष्ट्र प्रेमी नागरिकामध्ये देशभक्तीची भावना प्रकट होत असते . राष्ट्र प्रेमी आपल्या राष्ट्रभावना गाड्यांवर , बाईकवर , घरांवर तिरंगा फडकवून व्यक्त करत असतात. उद्या 26 जानेवारी म्हणजेच भारताचा प्रजासत्ताक दिन. काही राष्ट्र प्रेमींनी उद्याच्या दिवशी गाड्यांवर फडकवण्यासाठी ध्वज देखील विकत घेतले असतील, जर तुम्हीही असे करणार असाल तर सावधान! असे केल्याने होऊ शकते शिक्षा. करण्याअगोदर जाणून घ्या नियम! (Republic Day: Putting a flag on a car to show patriotism? Action may be taken against you …)

भारतीय ध्वज संहितेनुसार, वाहनांवर ध्वज लावण्याचा अधिकार काही ठराविक लोकांनाच देण्यात आला आहे, याशिवाय जर कोणी वाहनांवर झेंडा लावला तर त्याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई होऊ शकते.

2002 साली भारतीय ध्वज संहिता बनवण्यात आली होती. हि संहिता मुख्यतः ध्वजरोहनसाठीच बनवण्यात आली होती. यात ध्वज फडकवण्यासाठीचे नियमांचा स्पष्टपणे उल्लेख केला गेला आहे. यात असे नमूद आहे की, काही ठराविक व्यक्तीचं आपल्या वाहनांवर ध्वज फडकवू शकतात. त्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि उपसभापती, राज्य सभेचे उपसभपाती , राज्यपाल , उपराज्यपाल , मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष , भारताचे सरन्यायधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि परदेशात भारत दुत म्हणून कार्यरत असलेल्या आयोगाचे अध्यक्ष आणि पद यांचाच समावेश आहे. इतर व्यक्तीस गाडीवर ध्वज फडकवण्यास परवानगी नाही आणि तसे केले की त्या व्यक्तीस कठोर शिक्षा होऊ शकते.

कायदेदृष्ट्या लोकं आपल्या वाहनांवर ध्वज फडकवू नाही शकत, परंतु आपल्या घरांवर ध्वज फडकवण्याची परवानगी कायद्याने दिली आहे. पूर्वी तसे करता येत नव्हते पण नवीन जिंदाल यांनी केलेल्या मागणीनंतर 2004 साली या याचिकेवर सुनावणी झाली आणि न्यायलयाने परवानगी दिली.

2009 साली मिळालेल्या परवानगी नुसार, पुरेशी रोषणाई असेल तर रात्रीही तिरंगा फडकवता येऊ शकतो.

हे ही वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments