खूप काहीफेमस

‘सलमान अजून अंड्यात आहे’; Big Boss मधून बाहेर येतात, सलमानवर आरोप, 

दुसरं कोणी मोठं झालेलं सलमानला बगवत नाही, त्याचा 20 वर्षांचा इतिहास बघा, असे शंभर सलमान दारात उभे करेन, माझी गल्ली झाडायला

सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस’ हिंदीमधून मराठी व्यक्तिमत्व असलेले साताऱ्याचे अभिजित बीचुकले नुकतेच बाहेर पडले आहेत. ‘शो’मधून बाहेर येताच त्यांनी सलमान खानवर टीका करण्यास सुरुवात केली आहे आणि मोठे आरोपदेखील केले आहेत. आता अभिजित बिचुकलेने सलमान खानला नेमकं काय म्हटलं आहे, हेदेखील आपण समजून घेणार आहोत.

“दुसरं कोणी मोठं झालेलं सलमानला बगवत नाही, त्याचा 20 वर्षांचा इतिहास बघा, असे शंभर सलमान दारात उभे करेन, माझी गल्ली झाडायला, असा टोलाही बिचुकलेने सलमानला लगावला आहे. सलमान विरोधात राग व्यक्त करताना अभिजीत म्हणाला की बिग बॉसच्या घरात मला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला गेला. सलमानने माझ्यावर व्यक्त केलेला राग न शोभणारा आहे. सलमानने आतापर्यंत 14 शो चालवले. त्याला वाटतं की तो हा शो चालवत आहे, मात्र हा 15 वा शो मी चालवला, आणि इथेच तो कमी पडलो.

सलमानने जी भाषा वापरली, ती आजपर्यंत मला कोणी वापरली नाही. पिंजऱ्यात वाघ आहे, म्हणून तो हंटर फिरवत होता, आता वाघ पिंजऱ्यामधून बाहेर आला आहे. सलमान खान स्वत:ला काय समजतो? त्याला लवकरच दाखवून देईन की मी काय आहे, असंही बिचुकले म्हणाले आहेत.

सलमान खान अजून अंड्यात आहे. तो अजून अंड्यातून बाहेर आलेला नाही. ज्या लोकांनी मला प्रेम दिले, हा त्यांच्याच जीवावर उड्या मारत आहे.” बीचुकलेंचे म्हणणे होते की त्यांना या शोमधून बाहेरच पडायचे होते. त्यांना असल्या शोची गरज मुळातच नव्हती. बिग बॉसने केलेल्या विनंतीमुळे ते या शोमध्ये सहभागी झाले होते. या आधी बीचुकले मराठी ‘बिग बॉस’मध्ये गाजले होते. आता हिंदी ‘बिग बॉस’मधून बाहेर येताच त्यांनी सलमानवर घनघोर आरोप करायला सुरुवात केली आहे.

हे ही वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments