आपलं शहरराजकारण

शिवसेना – भाजपचे मिशन ! कोण मारणार मुंबई महानगर पालिकेवर बाजी? 

येणाऱ्या आगामी निवडणूकीत शिवसेनेचा बालेकिल्ला आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेली मुंबई भाजपा काबीज करू शकते की नाही?

कोरोनाचा पादुर्भाव जरी असला तरी मुंबईत निवडणुकीची तयारी जय्यत सुरू आहे. आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप हा सामना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. दोन्हीही पक्ष मुंबईतील जनतेचे मन जिंकण्यासाठी कंबर कसत आहेत. येणाऱ्या आगामी निवडणूकीत शिवसेनेचा बालेकिल्ला आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेली मुंबई भाजपा काबीज करू शकते की नाही? मुंबईत जिथे जिथे शिवसेना गेल्या निवडणूकीत दुसऱ्या क्रमांकावर होती त्या ठिकाणी शिवसेनेने प्रामुख्याने कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत आपले स्थान निर्माण करण्यासाठी भाजपा नेते रोज आरोप प्रत्यारोपांची खेळी करून अतोनात प्रयत्न करत आहेत. ( Shiv Sena – BJP’s mission! Who will bet on Mumbai Municipal Corporation?)

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिनी मुख्यमंत्री ऑनलाईन स्वरूपाने जनतेशी संवाद साधत होते. त्या दरम्यान त्यांनी भाजपा वर टिकांचे सशस्त्र सोडले. शिवसेना नेते संजय राउत यांनी देखील भाजप वर टीका टिपण्ण्या केल्या. याला प्रति उत्तर म्हणून विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत, भाजप आणि शिवसेनेत सध्या आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे. यात हा प्रश्न उभा राहतो की, पालिका मुंबईत नेमका कोणता पक्ष बाजी मारेल?

शिवसेनेने भाजपला चॅलेंज करत म्हटले आहे की, ” जर भाजपची इडी, सीबीआय , आयटीची चिलखत काढून मैदानात येण्याची तयारी असेल तर शिवसेना सुध्दा शहांचा चॅलेंज स्वीकारून एकटी लढेल. ” शिवसेना आता देशभर भगवा फडकवण्याच्या दिशेने हातपाय मारत आहे. येत्या निवडणुकीत शिवसेना भाजपच्या विरोधात राज्याबाहेर ही लढेल. अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि युवासेनेने मुंबईची जबाबदारी घेतली आहे. मुंबईकरांना आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालेले कामे माहीतच आहेत. शिवसेना ठाणे, कल्याण -डोंबिवली, वसई- विरारसह महाराष्ट्रच्या प्रत्येक पालिकेत भगवा फडकवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. पण त्यांचे मुख्य लक्ष हे मुंबई महानगर पालिका निवडणूक असेल, हे मात्र निश्चित.

हे ही वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments