एकदम जुनं

Shivsena : ठाकरे बंधूंमध्ये कायमची दरी निर्माण करणारं शिवसेनचं महाबळेश्वर अधिवेशन…

खुद्द राज ठाकरेंनीच शिवसेनेचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंची घोषणा केली होती.

ही गोष्ट आहे, उद्धव ठाकरे यांच्या राजकारणातल्या एन्ट्रीची. आता मुख्यमंत्री पदावर असलेल्या उद्धव ठाकरे यांना राजकारणात रस नव्हता, हे विधान अनेक अभ्यासकांच्या मते बरोबर आहे. उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफी आणि इतर गोष्टींची आवड होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात उद्धव ठाकरे यांना घेऊन वेगळा प्लॅन होता.

उद्धव ठाकरे यांनी भविष्यातली शिवसेना सांभाळावी आणि आपला उत्तराधिकारी व्हावं, असं मत बाळासाहेब ठाकरे यांचं होतं अस जाणकारांचे मत आहे. तसं नियोजन त्यांनी केलं आणि उद्धव ठाकरेंची राजकारणात यशस्वी एन्ट्री करुन घेतली. ही गोष्ट समजून घेण्याासाठी आपल्या काही वर्षे मागे म्हणजेच 1995 चा किस्सा समजून घ्यावा लागेल.

1995 च्या काळात भाजप आणि शिवसेनेच्या युतीची सत्ता होती. यावेळी राज ठाकरे अॅक्टिव्ह होते, ते शिव उद्योग सेनेच्या माध्यमातून अनेक कामं करायचे, मात्र याचवेळी रमेश केणी हत्या प्रकरण घडलं, ज्यात राज ठाकरे यांच नाव घेतलं गेलं, नंतर झालेल्या CBI चौकशीतून आणि ठोस पुरावे नसल्यामुळे राज ठाकरे यांचं नाव या प्रकरणातून बाजूला झालं, मात्र यामुळे राजकारणातून राज ठाकरे काहीशे दूर सारले होते. यातच उद्धव ठाकरे यांनी आपली ऍक्टिव्हिटी वाढवली होती.

1997 ची महापालिका निवडणूक लागली, या निवडणुकीतच उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कारभारात आणि राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर लागलेल्या 2002 च्या महापालिका निवडणुकांची थेट जबाबदारीच उद्धव ठाकरेंनी आपल्या खांद्यावर घेतली. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी  राज ठाकरे यांच्या समर्थकांना डावललं आणि स्वत:च्या समर्थकांना तिकीट दिलं, असंदेखील म्हटलं जातं, आपल्या लोकांना डावलणे, त्यांचं तिकीट कापणे यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली दरी वाढत होती.

हा सगळा प्रसंग सुरु असतानाच 30 जानेवारी  2003 रोजी महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचं अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात न कळत बाळासाहेब ठाकरेंच्या उत्तराधिकाऱ्याची चर्चा सुरु झाली. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? या नावांवर संभ्रम आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगू लागल्या.

30 तारीख ही अधिवेशनाची शेवटची तारीख होती, आणि याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तराधिकारी पदाची घोषणा होणार होती. काहींच्या म्हणण्यानुसार या दिवशी राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव समोर केला. शिवसेनेचे कार्याध्यक्षपद उद्धव ठाकरे यांच्याकडे असावं,असं राज यांचं ते मत होतं. या मतावर बाळासाहेब ठाकरेंचा मिळालेला होकार, हाच अनेक शिवसैनिकांना आदेश होता.

आतापर्यंत अनेक शिवसैनिकांसमोर हे स्पष्ट झालं होतं की  इथूनपुढे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच उद्धव ठाकरे यांचादेखील आदेश आपल्याला पाळावा लागणार. हा निर्णय कोणत्या अनुषंगाने घेण्यात आला, याची अनेक उत्तरे आता अनेकजण सांगत असतात. मात्र याच अधिवेशनामधून उद्धव ठाकरे यांचा किंग मेकर ते किंगपर्यंतचा प्रवास सुरु झाला होता.

याच अधिवेशनापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली दरी वाढत गेली असंही अनेक पत्रकार सांगत असतात. मात्र शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांची एन्ट्री हीच राज ठाकरे यांची एक्झिट होत होती, असंही अनेकजण म्हणत असतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments