घटना

आता वाईन पिऊन गाडी चालवल्यावर ड्रींक अँड ड्राईव्हची केस होणार का?

तुम्ही जबाबदार नागरिकाप्रमाणे मद्यपान करून गाडी चालवू नका , जर ब्रेथ अँनालायझमध्ये दारू पिऊन असल्याचे आढळून आले तर तुम्ही आमचे पाहुणे व्हाल."

गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने नवीन वाईन धोरण मंजूर केले होते. या धोरणाच्या अंतर्गत, प्रशासनाने सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईनची विक्री आणि खरेदी करण्याची परवानगी दिली होती. या संबंधित मुंबई पोलिसांनी केलेला मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरचा ट्विट खूप गाजत आहे. (Will there be a case of drink and drive after drinking and driving?)

वाईनच्या नव्या धोरणाला विरोधी पक्ष भाजपाच्या नेत्यांनी तीव्र विरोध केला. या विरोधाला उत्तर देत खासदार संजय राऊत म्हणाले की, ” वाईन म्हणजे दारू नाही. हे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे! वाईनची विक्री वाढल्याने शेतकऱ्यांनाच फायदा होईल.” फक्त इतकंच नाही तर ,”भाजपला फक्त विरोध करता येतो, शेतकऱ्यांसाठी काहीच करता येत नाही.” असे विधान करत राऊतांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता.

राऊतांच्या या वक्तव्यावर शिवम वहिया नावाच्या युजरने ट्विटरवर गमतीने ट्विट केले असून, ट्विटमध्ये मुंबई पोलिसांनादेखील टॅग केले आहे. शिवमने ट्विटमध्ये प्रश्न विचारला की ,”जर मी मद्यपान करून गाडी चालवत असेल तर पोलीस मला तुरुंगात टाकतील की जवळचा बार दाखवतील?”

या गंमती व्यक्तीला पोलिसांनीदेखील गंमतीशीर उत्तर दिले आहे. मुंबई पोलिसांनी अधीकृत ट्विटरद्वारे उत्तर देत म्हणाले की,” सर, तुम्ही जबाबदार नागरिकाप्रमाणे मद्यपान करून गाडी चालवू नका , जर ब्रेथ अँनालायझमध्ये दारू पिऊन असल्याचे आढळून आले तर तुम्ही आमचे पाहुणे व्हाल.”

 

पोलिसांच्या या प्रतिसादाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments