हेल्थ

मुंबईत कधीपासून मास्क बंद होणार; तज्ञांनी मांडलं संपूर्ण विश्लेषण

कोरोना संसर्ग होण्याच्या धोक्याने 2020 पासून सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे हे सक्तीचे केले आहे.

कोरोना संसर्ग होण्याच्या धोक्याने 2020 पासून सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे हे सक्तीचे केले आहे. त्यामुळे मास्क हा शरीराचा एक अविभाज्य घटक बनला आहे. जगभरात कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर आवश्यक असल्याचे मानण्यात आले आहे; पण अशावेळी महाराष्ट्र सरकार मात्र मास्क घालण्याचे बंधन हटवण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा देखील झाली आहे. चार्चा जरी झाली असली तरी याबाबत निर्णय अजून झालेला नाही. (When Can We Stop Masking Against Covid-19)

कोरोना टास्क फोर्सचा समावेश

सर्व नागरिकांचे जोपर्यंत लसीचे दोन्ही डोस पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध पाळणे आवश्यक आहे. आपल्या देशातही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून अतिशय वेगाने लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत 14 कोटी 69 लाख 57 हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 6 कोटी 3 लाख 12 हजार 240 नागरिकांनी दुसरा, तर 8 कोटी 59 लाख 17  हजार 37 पहिला डोस देण्यात आला आहे. (Are masks compulsory in England)

मंत्रीमंडळच्या बैठकीत मास्क संदर्भात लवकरच टास्क फोर्सशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण जाहीर होणार आहे. तसेच मास्क मुक्ती हवी असेल, तर याबाबत टास्क फोर्सशी बोलणं गरजेच आहेच त्याप्रमाणे नियमावली देखील असणं महत्वाचे आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. (Can masks prevent the transmission of COVID-19)

अनेक देशांनी मास्क वापरणे यापासून सुटका केली आहे. परंतु भारतात अजुन हा निर्णय शक्य झालेला नाही. मास्क सक्ती करण्यापेक्षा मास्क वापरण्याची इच्छा निर्माण करावी असा सल्ला डॉ. रवी गोडसे यांनी दिला आहे. लोक मास्क घालत नाहीत म्हणून आपण दंड आकारु नका तर लोकांनी मास्क घालावे यासाठी इच्छा निर्माण करा, तसेच आणखी दोन आठवडे मास्क घातल्यानंतर आपल्याला मास्कपासून मुक्ती मिळू शकते असा अंदाज डॉ. रवी गोडसे यांनी व्यक्त केला आहे. (How should I properly wear a mask during COVID-19)

कोणत्या देशांनी मास्क सक्ती हटवली

संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना मास्क न घालण्याची परवानगी देणारा इस्रायल हा जगातील पहिला देश होता. इस्रायलने अत्यंत वेगवान लसीकरण मोहीम राबवून जनतेला मास्कमुक्त केले, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पसरलेल्या कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे,रुग्ण संख्या वाढू लागल्याने तिथे पुन्हा मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले. आज जगात मास्क घालण्यापासून मुक्तता झालेल्या देशांमध्ये ब्रिटन, अमेरिका, स्वीडन, चीन, न्यूझीलंड, हंगेरी, इटली यांचा समावेश आहे. अलीकडेच सौदी अरेबियानेही लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मास्क न घालण्याची परवानगी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments