आपलं शहरराजकारण

Student protest : धारावीतील विद्यार्थी आंदोलनाची चौकशी होणार ; गृहमंत्र्यांनी दिले आदेश

परिक्षा ऑफलाईन नको तर ऑनलाइन घेण्यात याव्या यासाठी हजारो विद्यार्थी आज धारावी येथील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर जमा झाले होते.

मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी अनेक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. मुंबईत तर मोठया प्रमाणात विद्यार्थी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांच्या घराबाहेर जमा झाले होते. शाळा आणि कॉलेजचे शिक्षण ऑनलाइन (Online Education) घेतल्यामुळे परीक्षा ऑनलाईनच घ्यावी यासाठी मुंबईतील विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावी येथील घरासमोर आंदोलन केले. या आंदोलनात मुंबई, ठाणे, वसई अशा अनेक ठिकाणाहून विद्यार्थी सहभागी होते. (Exams should be online, not offline;  Students agitation outside the education minister’s house) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नाराजी दर्शवली असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

परिक्षा ऑफलाईन नको तर ऑनलाइन घेण्यात याव्या यासाठी हजारो विद्यार्थी आज धारावी येथील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर जमा झाले होते. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी नाराजी दर्शवली असून, एकावेळी एवढे विद्यार्थी जमा होऊ शकत नाहीत, त्यांच्या मागे कोण तरी असण्याची शक्यता आहे. या सर्व आंदोलनाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत. शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेलं आंदोलन योग्य नाही. तसेच विध्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री योग्य मार्ग काढतील, विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे अस आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.

आज 4 वाजता सर्व विद्यार्थी धारावी येथून परत गेले तसेच उद्या ज्यांनी विद्यार्थ्यांना जमण्याचं आवाहन केलं होतं ते हिंदुस्थानी भाऊ (Hindusthani Bhau) हे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments