Student protest : ज्याच्या एका शब्दावर जमले एवढे विद्यार्थी, असा हिंदुस्थानी भाऊ आहे तरी कोण ?
हिंदुस्तानातील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या राज्यातील शिक्षणमंत्रांच्या घरासमोर ३१ जानेवारीला आंदोलन करा. जर मंत्री मीटिंगसुद्धा ऑनलाईन घेत आहेत मग विद्यार्थ्यांनी परीक्षा का ऑफलाईन द्याव्यात? त्यांच्या जीवाशी हा खेळ आहे असा प्रश्न हिंदुस्थान भाऊने उपस्थित केला होता.

2 दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर “हिंदुस्तानी भाऊ” यांनी त्यांच्या अकाउंट वरून एक live व्हिडीओ पोस्ट केली. आणि त्यानंतर आज महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikvad) यांच्या घरासमोर आंदोलन केले. (Student protest in mumbai)
हिंदुस्तानातील सर्व विद्यार्थ्यांनो स्वतःच्या राज्यातील शिक्षणमंत्रांच्या घरासमोर ३१ जानेवारीला आंदोलन करा. जर मंत्री मीटिंगसुद्धा ऑनलाईन घेत आहेत मग विद्यार्थ्यांनी परीक्षा का ऑफलाईन द्याव्यात? त्यांच्या जीवाशी हा खेळ आहे असा प्रश्न हिंदुस्थान भाऊने उपस्थित केला होता. 31 जानेवारीला मी स्वतः महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसोबत ठीक दुपारी 12 वाजता मुंबईतील धारावीमधील वर्षाताई गायकवाड यांच्या घरासमोर निवेदन घेऊन जाणार आहे. आपल्याला तिथे काही भांडण वगैरे करायचे नाही. आपल्याला फक्त निवेदनासाठी आणि आंदोलनासाठी जायचे आहे. याच सोबत त्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराचा पत्ता देखील पोस्टच्याखाली दिला होता. याच पाश्र्वभूमीवर अनेक विद्यार्थी आज धारावीतील वर्षा गायकवाड यांच्या घराच्या बाहेर जमले होते. विद्यार्थी पोलिसांच ऐकत नसल्याने पोलिसांना विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला. तसेच हिंदुस्थानी भाऊला पोलिसांकडून कलम 188 नुसार नोटीस देखील बजावण्यात आली. ज्याच्या एका व्हिडिओवर वसई – विरार, कल्याण, डोंबिवली आणि मुंबईतील एवढी मुलं जमा झाली हा हिंदुस्थानी भाऊ आहे तरी कोण?
कोण आहे हिंदुस्तानी भाऊ?
विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ हे फेमस युट्युबर आहेत. तसेच त्यांचे सोशल मीडियावर देखील हजारो, लाखो फॉलोव्हर्स आहेत. त्यांचे सर्व व्हिडिओ त्यांच्या सुझुकी एर्टीगा कार मध्ये बसून शूट केलेले असतात. भाऊंनी पत्रकारिता केली असून तसेच त्यांना मुंबईमध्ये 2011 रोजी बेस्ट क्राईम रेपोर्टरसाठी अवॉर्ड मिळाला होता. भाऊंना सामाजिक कार्यातदेखील आवड असल्यामुळे त्यांचे स्वतःचे ‘आदित्य युवा प्रतिष्ठान’ नावाचे एक NGO आहे. या NGO ला त्यांच्या मुलाचे नाव दिले आहे.
तसेच यासोबत ते ‘संकल्प युवा प्रतिष्ठान’ या NGO मध्येपण सहभागी आहेत. जुलै 2019 मध्ये त्यांच्या युट्युब चॅनेलचे एक लाख सबक्रायबर पार झाल्यावर त्यांना युट्युबकडून सिल्वर बटण देण्यात आले. त्यांच्या व्हिडिओमधून ते पाकिस्तानी लोक जे भारताबद्दल वाईट बोलतात त्यांना शिव्या देतात.
2019 मध्ये त्यांची प्रसिद्धी बघून त्यांना ‘बिग बॉस 13’ या रियालिटी शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मधून काही वेळासाठी घेण्यात आले होते. तसेच भाऊंची सलमान खानकडून देखील खूप स्तुती होत होती.

मध्यंतरी हिंदुस्थान भाऊने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेतली होती?. यावेळेस हिंदुस्थानऊ भाऊ एका व्हिडिओतुन म्हणालाहोता की, आपल्या व्हीडिओमध्ये तो म्हणाला, जय हिंद! मी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. बाळासाहेबांनंतर कोणता नेता आहे जो कुणाला घाबरत नाही तर ते राज ठाकरे आहेत. आपल्याला अशी माणसं आवडतात.