अर्थकारण

TMC Recruitment : मुंबईच्या आरोग्य विभागात मोठी पद भरती, असं करा अप्लाय

कोरोनाची तिसरी लाट आणि आरोग्य विभागाच्या अनेक समस्या यांमुळे मुंबईतील आरोग्य विभाात भरती करण्याची तयारी सुरु आहे.

TMC Recruitment : कोरोनाची तिसरी लाट आणि आरोग्य विभागाच्या अनेक समस्या यांमुळे मुंबईतील आरोग्य विभाात भरती करण्याची तयारी सुरु आहे. याचाच एक म्हणून टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई (Tata Memorial Hospital, Tata Memorial Center Mumbai) इथे अनेक पदांसाठी भरती केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली असल्याचंही म्हटलं जात आहे. (TMC Mumbai Recruitment 2022)

कोणत्या पदांसाठी भरती?

सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधीक्षक, नर्सिंग अधीक्षक ग्रेड II, वैज्ञानिक अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ, लघुलेखक, सहाय्यक आहारतज्ज्ञ या पदांसाठी भरती संबंधित भरती असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

शैक्षणिक अट काय?

संबंधित भरतीसाठी M.Ch. / D.N.B. किंवा MD पर्यंत शिक्षण आवश्यक आहे.
नर्सिंग अधीक्षक ग्रेडसाठी M.Sc पर्यंत शिक्षण असणं गरजेचं आहे.
वैज्ञानिक अधिकारी पदासाठी उमेदवारांनी M.D./Ph.D. पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ M.Sc. (Physics) and Diploma in Radiological Physics पर्यंतचे शिक्षण गरजेचं आहे.
तंत्रज्ञ – 12th Std. in Science and Diploma पर्यंत शिक्षण गरजेचं आहे.

सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधीक्षक, नर्सिंग अधीक्षक ग्रेड II या पदांसाठी 78,800/- रुपये प्रतिमहिना पगार मिळण्याची शक्यता आहे.

वैज्ञानिक अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, वैज्ञानिक सहाय्यक अशा पदांसाठी 40 हजार ते 50 हजारच्या दरम्यान पगार मिळण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक कराhttps://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=9245

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments