अर्थकारण

Tata Sky to Tata Play : ‘टाटा स्काय’ झाली ‘टाटा प्ले’, नावासह केले गेले आणखीन मोठे बदल… 

इस को लगा डाला तो लाइफ झिंगा लाला हे तर सर्वांनी ऐकलेच असेल, मुळात अनेकांनी या संबधित काही जाहिराती सुध्दा पहिल्या असतील.

इस को लगा डाला तो लाइफ झिंगा लाला हे तर सर्वांनी ऐकलेच असेल, मुळात अनेकांनी या संबधित काही जाहिराती सुध्दा पहिल्या असतील. हे स्लोगन आहे, एका प्रसिद्ध D2H कंपनीचे! जिचे नाव आहे ‘टाटा स्काय’. ( Tata Sky to Tata Play: ‘Tata Sky’ became ‘Tata Play’, another big change was made with the name …)

सुप्रसिध्द D2H सेवा वितरक ‘टाटा स्काय’ ने आपल्या नावात बदल केला आहे. आता टाटा स्काय कंपनी ‘टाटा प्ले’ या नावाने ओळखली जाणार आहे. इतकंच नाही तर कंपनीने अजून खूप बदल केले आहेत. टाटा प्लेचे एमडी आणि सीईओ हरित नागपाल म्हणाले की,”आम्ही सुरूवातीला एक डीटीएच कंपनी म्हणून सुरूवात केली होती. परंतु आता आम्ही कंन्टेन्ट डिस्ट्रिब्युटर कंपनी बनलो आहोत. ग्राहकांच्या गरजा बदलत होत्या आणि ते ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा वापर करत होते. आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार केला होता आणि ग्राहकांना इंटिग्रेटेड एक्सिपिरिअन्स देऊ इच्छित होतो. यासाठी आम्ही बिंज लाँच केलं आणि विशिष्ट ब्रॉडबँड व्यवसायही करत आहोत. डीटीएच आपला तेजीने वाढणारा व्यवसाय आहे आणि तो मोठा व्यापार कायम राहील.

टाटा स्काय हि D2H सेवा 2006 पासून सुरू झाली, हि कंपनी टाटा सन्स आणि 21st Century Fox यांच्यातील 80:20 जॉइंट व्हेंचरच्या रूपात लाँच झाली. फॉक्स आणि टाटा ग्रुप्सने टीएस इन्व्हेस्टमेंट्सची स्थापना केली, ज्यांचा टाटा स्कायमध्ये 20 टक्के हिस्सा आहे. यामुळे फॉक्सला 9.8%ची अतिरिक्त अप्रत्यक्ष भागीदारी मिळाली. नंतर, जेव्हा मर्डोक यांनी फॉक्सचा मनोरंजन व्यवसाय वॉल्ट डिस्ने कंपनीला विकला तेव्हा टाटा स्कायमधील स्टेकदेखील कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला.

हे ही वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments