आपलं शहरविद्यापीठ

1 फेब्रुवारी पासून कॉलेजची दारं पुन्हा उघडणार, फक्त 2 लसी घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच येण्याची परवानगी …

कोविडच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाला असतील.

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा कमी होत असलेला संसर्ग पाहता शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, कोविडच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाला असतील. दोन्ही लसी घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल. ( The doors of the college will be reopened from February 1, only students who have been vaccinated will be allowed to come … )

15 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा ऑनलाइन घ्यायच्या असतील, तर स्थानिक पातळीवरील परीक्षा ऑफलाइन घ्याव्यात की ऑनलाइन याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार विद्यापीठाकडे आहेत. तसेच , सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर कॉलेज सुरू करण्यासाठी दबाव आला होता.

कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे एकूण दोन वर्षांचे शैक्षणिक नुकसान झाले, तर तिसऱ्या लाटेत राज्य सरकारने पुन्हा शाळा, महाविद्यालये बंद केली. राज्यभरात 15 ते 18 वयोगटातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर आता महाविद्यालय तातडीने सुरू करण्याच्या मागणीचा विचार करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments