आपलं शहरनॅशनल

मुंबईच्या कन्येने महाष्ट्राचा झेंडा दिल्लीत फडकवला

मुंबईच्या कन्येने महाष्ट्राचा झेंडा दिल्लीत फडकवला.

देशात प्रजाकसत्ताक दिन अत्यंत धामधुमीत साजरा झाला. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व नियम पाळत सर्वत्र प्रजाकसत्ताक दिनाची धामधूम होती. या वेळचा प्रजाकसत्ताक दिन महाराष्ट्रासाठी आणि त्यामध्ये मुंबईसाठी अत्यंत महत्वाचा ठरलया आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर वितरित केले जाणाऱ्या सन्मानात महाराष्ट्रातील अनेकांनी आपली छाप उमठवली. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार. तसेच पद्म पुरस्कारांमध्ये देखील महाराष्ट्राला 10 पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्रासाठी आणखी एक अभिमानाची गोष्ट घडली आहे. मुंबई जवळच्या मिरारोड येथे राहणाऱ्या पृथ्वी पाटील या मुंबईच्या कन्येने महाष्ट्राचा झेंडा दिल्लीत जाऊन फडकवला आहे. यामुळे तीच सर्वत्र कौतुक केलं जात आहे. ( The girl from Mumbai hoisted the flag of Maharashtra in Delhi )

मुंबईच्या कन्येने महाष्ट्राचा झेंडा दिल्लीत फडकवला28 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईच्या कन्येचं सन्मान होणार आहे.

पृथ्वी सध्या मुंबईच्या जयहिंद कॉलेजमधून बीएससीच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती मीरा रोडच्या न्यू गोकूल धाम या सोसायटीत राहते. तिचे वडिल मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेवून, आता ते इतर मुलांना राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि सैनिक स्कुलचे प्रशिक्षण देत आहेत. तर पृथ्वीची आजी कमल पाटील या देखील मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून 32 वर्ष काम केलं आहे. त्यामुळे पृथ्वीच्या घरात नेहमी देशसेवाचा माहौल राहीला होता. त्यातून तिने एनसीसीचं प्रक्षिशण घेतलं आणि आज तिने घवघवीत यश मिळवलं आहे.

नॅशनल कॅडर संचनालय 2022 मध्ये महाराष्ट्राची राष्ट्रीय छात्र सेनेची कॅडेट, वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटीलला राष्ट्रीय पातळीवरच्या बेस्ट कॅडेटचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पृथ्वीचे कौतुक केले जात आहे यामुळे तिच्या घरी आनंदाचे वातावरण आहे.

हे ही वाचा:

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments