आपलं शहरबीएमसी

देशातील सगळ्यात मोठा समुद्री मार्ग, कसा आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक

जेएनपीटी आणि थेट साऊथ मुंबईला जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

जेएनपीटी आणि थेट साऊथ मुंबईला जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, पण अजून अनेक टप्पे बाकी आहेत.(The longest sea route in the country, is the Mumbai Trans Harbor Link)

जेएनपीटी आणि थेट साऊथ मुंबईला जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, पण अजून अनेक टप्पे बाकी आहेत. पहिला टप्पा म्हणजेच या लिंकचा पहिला ओएसडी (अर्थोटोपीक स्टील डेक) बसवला गेला आहे. या ओएसडीला उचलून त्याच्या दोन खांबावर ठेवण्यात आलं आहे. या ओएसडीची लांबी 119 मीटर एवढी तर वजन 1331 टन एवढे आहे. म्हणजेच पाण्यामधून या ओएसडीला उचलून खांबावर चढवण्याचे कामही तेवढेच कष्टाचे असणार आहे. या लिंकसाठी असेच एकूण 70 ओएसडी लावले जाणार आहेत. तर यांची जास्तीत जास्त लांबी ही 180 मीटर पर्यंत असणार आहे. या ओएससडीची निर्मिती व्हिएतनाम येथे होत आहे. व जापानी कंपनीच्या स्टीलचा वापर यामध्ये केला जात आहे. या लिंकला जपानी कंपनीची फंडिंग होत असल्याने स्टीलचा वापर ही याच कंपनीमधील होत आहे.

मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक हा असा मार्ग असेल, जो मुंबईला थेट नवी मुंबई, उलवे, नावाशेवा व जेएनपीटी या शहरांशी जोडेल व जो प्रवास करण्यासाठी लोकांना 1.30 ते 2 तास लागत आहेत, तिथे तो प्रवास 20 मिनिटात होऊ शकतो. या प्रकल्याची सुरुवात ही भरपूर रिसर्च व खूप सारे टेक्निक लावून केली आहे. एकूण 70 ओसडीची मिळूनही लिंक तयार होत आहे. या प्रकल्याचे 65% काम हे पूर्ण झाले आहे. सर्व खांब लावून तयार आहेत. मात्र तरीही या प्रकल्याच्या पूर्णतेसाठी वाट पहावी लागणार आहे. याची अंतिम तारीख ही डिसेंबर 2023 दिली आहे, मात्र कामाचं स्पीड आणि इतर तांत्रिक गोष्टी यामुळे हे काम काही पूर्ण होईल, हे पाहणे गरजेचे आहे.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments