लोकल

रविवारी या मार्गावर असणार मेगाब्लॉक, वेळापत्रक बघूनच नियोजन करा

दर आठवड्यानुसार रविवारीही विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी सुट्टी आहे म्हणून सह परिवार प्रवासाचे नियोजन करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा, अन्यथा तुमचा खोळंबा होईल, त्यामुळे ब्लॉक पाहूनच नियोजन करा.

या मार्गावर असेल मेगाब्लॉक

पनवेल ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक.

(बेलापूर ते खारकोपर सेवा प्रभावित नसतील; नेरुळ- खारकोपर रेल्वेसेवा रद्द)

पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१६ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल कडे जाणा-या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

नेरूळ येथून सकाळी ११.४० ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत खारकोपरसाठी सुटणारी डाउन मार्गावरील सेवा आणि खारकोपर येथून सकाळी १२.२५ ते सायंकाळी ४.२५ पर्यंत नेरूळसाठी जाणारी अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी सेक्शन मध्ये विशेष उपनगरीय ट्रेन चालविण्यात येतील.

ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत सुटणाऱ्या धीम्या रेल्वेगाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या ट्रेन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे धीम्या डाउन मार्गावर वळवल्या जातील.

घाटकोपर येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments