आपलं शहरनॅशनलनॉलेज

माझगाव डॉकमध्ये तयार झालेल्या पाणबुडी झळकणार राजपथावर

भारतीय नौदल 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेवर आधारित चित्ररथ बनवणार आहे. यात मुख्यतः मुंबई नौसैनिकांचा इतिहास दाखवला जाईल.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी साताऱ्याचे ‘ कास पठार’ अवतरणार आहे. केंद्र सरकारने यंदा ‘ स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सव’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दोन संकल्पनांची निवड केली आहे. अनेक विभाग आणि राज्य या संकल्पने वर आधारित चित्ररथ साकारणार आहेत. त्यानुसार नौदलाने देखील या दोन संकल्पनांवर आधारित चित्ररथ तयार करणार असल्याचे सांगितले आहे. (The submarine built at Mazgaon Dock will shine on the highway)

भारतीय नौदल ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ बनवणार आहे. यात मुख्यतः मुंबई नौसैनिकांचा इतिहास दाखवला जाईल. यात प्रामुख्याने भारतीय नौदलाच्या युद्धनौकांची प्रतिकृती उभारण्यात येईल.

यात, नौदलात नव्यानेच दाखल झालेले ‘आय.एन.एस विशाखापट्टणम’ या नौकेची प्रतीकृती उभारली जाईल. मुळात या नौकेचे तळ मुंबईतच आहे. त्याचसोबत ‘आयएनएस दिल्ली’, ‘आयएनएस गोदावरी’, ‘आयएनएस कलवरी’ (पाणबुडी) श्रेणी या मुंबईतील माझगाव डॉकमध्ये तयार झालेल्या पश्चिम कमांडचा भाग असलेल्या युद्धनौकांच्या प्रतिकृती ‘आत्मनिर्भर भारत’ या नात्याने चित्ररथात असतील.

हे ही वाचा:

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments