
प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर ठिकठिकाणी कार्यक्रम पार पडत आहेत. याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील निर्भया पथकाच्या थीम गाण्याचे उदघाटन करण्यात आलं. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करणे, अत्याचार होत असल्यास हस्तक्षेप करून तिला सुरक्षितता देणे, गुन्ह्यांचा त्वरीत तपास करणे, कोर्टातील प्रकरणांचा पाठपुरावा करणे हे बृहन्मुंबई पोलीस दलाचे प्राधान्याचे काम असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले. ( dial 103; Annie Howe, Annie Condition Get help; New police initiative )
महिलांवरील अत्याचार थांबवणे, तत्काळ प्रतिसाद देऊन महिलांना संरक्षण देण्यासाठी निर्भय पथके काम करणार असून मुंबईतील 91 पोलीस ठाण्यात अशी पथके स्थापन करण्यात येत आहे. जाणीव जागृतीसाठी आज निर्भया फेसबूक, निर्भया पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे. निर्भया फेसबूक, निर्भया संकल्पगीत, निर्भया लोगोचे अनावरण अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सुरक्षिततेप्रती लोकमनात जागृती करण्यात येत असल्याची माहिती ही त्यांनी दिली.
१०३ हा हेल्पलाईन नंबर डायल केल्यानंतर निर्भया पथकाची मदत मिळणार आहे. यासाठी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना डेटा सुविधासह फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अशी माहिती त्यांनी दिली.
निर्भया थीमचे उद्घाटन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते तर हिंदी चित्रगीताचे रोहित शेट्टी यांनी तयार केले असून त्यास अभिनेते आमिताभ बच्चन यांचा आवाज लाभला आहे तर मराठी चित्रगीत राहूल रायकर आणि त्यांच्या टीमने तयार केले आहे.
हेही वाचा:
- Maharashtra Tableau : दिल्लीच्या राजपथावर गाजला ‘महाराष्ट्र माझा’
- 1 फेब्रुवारी पासून कॉलेजची दारं पुन्हा उघडणार, फक्त 2 लसी घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच येण्याची परवानगी …
- मुंबईच्या सागर कन्येचा पंतप्रधानांच्या हस्ते होणार सन्मान…