अर्थकारण

Union Budget 2022 : डबेवाल्यांचेही बजेटकडे लक्ष, पूर्ण होणार का त्यांच्या ‘या’ अपेक्षा?

Union Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत बजेट सादर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन बजेट सादर करणार आहेत. या बजेटकडे सर्व देशवासीयांचे लक्ष लागले आहे. मुख्यतः आगामी 5 राज्यांच्या दृष्टीने केंद्र सरकारचा या राज्यांना जास्त कल असण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांचे देखील याकडे लक्ष लागलं आहे. विशेषतः मुंबईत 130 वर्ष जनतेला सेवा देणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचे बजेटकडे लक्ष लागलं असून त्यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत.

देशातील सुरू असलेली धामधूम विचारात घेता, यंदाच्या अर्थसंकल्पात, स्वप्न पूर्ण होण्याची वाट पाहणाऱ्या काही घटकांचे अच्छे दिन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अर्थसंकल्पामध्ये मुंबईच्या डब्बेवाल्यांची स्वप्ने पूर्ण होणार का ? याबाबत मोठी उत्सुकता आहे. कारण या केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वेचा अर्थसंकल्प समाविष्ठ असेल्यामुळे रेल्वेबाबतच्या अनेक गोष्टी अर्थमंत्री जाहीर करणार आहेत.

मुंबईतील अनेक चाकरमान्यांचा अन्नदाता आणि वेळोवेळी डब्बा सुरक्षित पोहचवण्याचे काम हे डब्बेवाले करत असतात. मुंबईतील डब्बेवाले हे मुंबईकरांसाठी एक अविभाज्य घटक आहे. मात्र लोकलच्या गर्दीत आज हे डब्बेवाले स्वत:ची वाट हरवून बसले आहेत.
रेल्वे बजेट मांडले जाणार आहे त्या बजेट मधुन डबेवाल्यांच्या ह्या काही माफक अपेक्षा आहेत त्या पुर्ण होतील अशी मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी व्यक्त केली आहे.

डबेवाले आपलं काम हे सायकल आणि लोकलच्या माध्यमातून करतात. त्यामुळे रेल्वेच्या पासात व लगेज पासात कोणतीच वाढ होऊ नये, अशी अपेक्षा डबेवाल्यांची आहे.

सरकत्या जिन्यांची संख्या खुपच मर्यादीत आहे ती वाढली पाहीजे प्रत्येक फलाटावर सरकते जिने उपलब्ध झाले पाहीजे म्हणजे डोक्यावरून डब्याची चळत घेऊन प्रत्येक ठिकाणी डबेवाल्याला चढावे लागणार नाही. यामुळे नागरिकांना देखील फायदा होईल.

डबेवाल्यांनसाठी लगेज डब्यात आरक्षण वेळा दिल्या आहेत. त्या वेळेत तर प्रवाशीही त्या लगेज डब्यात प्रवास करतात त्याचे वर कारवाई व्हावी.

प्रत्येक रेल्वे स्टेशन बाहेर सायकल पार्किंगला जागा असावी.

प्रत्येक स्टेशनला प्रसाधनगृहांची संख्या खुपच कमी आहे. जी प्रसाधनगृह आहे तीही गैरसोयीच्या जागी आहेत. ती सोयीच्या जागी बांधावीत व त्याची संख्याही वाढवावी व त्याची योग्यती देखभाल ठेवावी.

अशा अपेक्षा डबेवाल्यांनी व्यक्त केल्या आहेत. यामुळे 1 फेब्रुवारीच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments