
कमी होत आलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग आता परत वाढताना पाहायला मिळत आहे. आणि त्यासोबतच सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी असे आजार ही पसरत आहेत. त्यामुळे लोकांना कोरोना आणि आजार यामध्ये नक्की फरक कळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही कोरोनाची लक्षणे असल्याचं समजून अनेकजण कोरोना टेस्ट करून घेत आहेत. मग अशात घरून कोरोना चाचणी करणाऱ्या लोकांसाठी काही निर्बंध लावले गेले आहेत. या निर्बंधासंबंधीची माहिती महापालिका आयुक्त सुरेश कांकाणी यांनी दिली आहे.(Use a self test kit? Wait, look at all the rules first)
कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आकडा पाहून आयसीएमआर ने सर्वांना टेस्ट करण्यासाठी घरीच टेस्टिंग किटचा वापर करण्याची परवानगी दिली होती. या टेस्टिंग किटचा वापर करणाऱ्या लोकांनी त्यांच्या अहवालाची माहिती द्यायचे निर्देश लावले होते. त्यानुसार एकूण 1 लाख 7 हजार लोकांनी त्यांची माहिती अपलोड केली आहे, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली आहे. यामध्ये पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अशी दोन्ही प्रकारची माहिती समाविष्ट आहे. याच टेस्ट किटच्या वापराबाबत काही नवीन नियमावली लावली गेली असल्याची माहिती सुरेश कांकाणी यांनी दिली आहे. ही नियमावली प्रामुख्याने लस निर्माते, विक्रेते व वितरक यांच्यासाठी आहे. या नियमावलीचा प्रमुख उद्देश कोणताही पॉझिटिव्ह रुग्ण यंत्रणेपासून लपला जाऊ नये, व तो या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या वाढीसाठी कारणीभूत ठरू नये एवढाच आहे.
या नियमावलीनुसार लस निर्माते, होलसेलर्स, सेमी होलसेलर्स व वितरक यांनी हे टेस्टिंग किट कोणत्या रिटेलर्सना, केमिस्ट किंवा फार्मासिस्ट यांना विकले व किती संख्येमध्ये दिले आहेत याची माहिती द्यायची आहे. व या माहितीनुसार त्या केमिस्ट, फार्मासिस्ट किंवा रिटेलर्स यांनी हे टेस्टिंग किट कोणत्या ग्राहकाला विकले, व त्यांचा नाव व पत्ता अशी संपूर्ण माहिती कळवायची आहे. संपूर्ण दिवसात एकूण किती वितरण झाले व यांची पूर्ण माहिती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत द्यायची आहे. ही माहिती ईमेल च्या मार्फत कळवायची आहे. अशी नवीन नियमावली लावली जाणार आहे.
ईमेल द्वारे मिळालेली ही माहिती 24 प्रभागांमध्ये विभागली जाईल. व त्याप्रमाणे टेस्ट केलेल्या लोकांच्या अहवालाची माहिती घेतली जाईल. यामध्ये किती लोकांनी टेस्ट केली आहे, नसेल केल्यास करावी, त्यांचे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिपोर्ट्स याबद्दलची सर्व माहिती घेतली जाईल. सोमवार पासून ही नियमावली लावली जाणार असून उत्पादक व वितरक कंपन्यांची माहीती सोमवार पासून येऊ लागेल व त्यानुसार एकूण रुग्णसंख्या, पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अहवाल या सर्वांचा अंदाज लावता येईल अशी माहिती महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
हे हि वाचा: