फेमस

Kala Ghoda : ‘काळा घोडा’ इतका प्रसिद्ध कसा; त्याच्यावरील पुतळा कुठे गेला?

मुंबईतील एक आकर्षणाचे केंद्रबिंदू म्हणजे 'काळा घोडा' होय. नक्की हा काळा घोडा आहे तरी काय? याची मुख्य वैशिष्ट्य काय, हे ठिकाण इतकं का प्रसिद्ध आहे, हेच आपण आजच्या व्हिडीओमधून समजून घेणार आहोत.

Kala Ghoda : 18 व्या शतकात अल्बर्ट अब्दुला ससून आणि ज्यू व्यापाऱ्यांनी वेल्सचा राजकुमार एडवर्ड सातवा याचा घोड्यावर बसलेला एख पुतळा मुंबईमध्ये उभा करण्याचं ठरवलं. या पुतळ्याची निर्मिती काळ्या दगडापासून करण्यात आली. त्या राजाचा पुतळा आणि घोडा हा संपूर्णरित्या काळ्या खडकापासून आणि साहित्यापासून बनवल्यामुळे त्याला काळा घोडा नाव ठेवण्यात आलं, अशी माहिती आहे.  (what about kala ghoda)

हा काळा घोडा परिसर म्हणजे ‘जहांगीर आर्ट गॅलरी’ आणि ससून लायब्ररीज् जवळील प्रसिद्ध ठिकाण आहे. दरम्यान 1965 मध्ये, महाराष्ट्र सरकारने संपूर्ण शहरातील प्रमुख ठिकाणांहून ब्रिटीश राज्यकर्त्यांचे पुतळे हटविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा पुतळा भायखळा प्राणी संग्रहालयात हलविण्यात आला. म्हणून आज आपल्याला या काळा घोडा पुतळ्यामध्ये ब्रिटिश राजा नसलेला पण फक्त ‘काळा घोडा’ असलेला पुतळा पाहण्यास मिळतो. (why famous kala ghoda festival)

हा झाला ‘काळा घोडा’ याचा इतिहास; पण लोक दरवर्षी ज्या महोत्सवाची वाट पाहतात, त्या काळा घोडा महोत्सवाची सुरुवात 1999 मध्ये झाली. गेल्या दोन वर्षापासून लोकांना या महोत्सवाचा आनंद घेता आला नाही, परंतु गेल्या वर्षी हा महोत्सव ऑनलाईन पध्दतीने पार पडला.

हा महोत्सव देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव म्हणुन ओळखला जातो. या महोत्सवात हस्तकला, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य आणि संगीत कला असे विविध राज्यातील स्टॉल नागरिकांसाठी उपलब्ध असतात. काळा घोडा महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे कलाकार आणि नवोदित कलाकारांना आपली कला सदर करण्याचे व्यासपीठ उपलब्ध होते. यावर्षी हा महोत्सव 05 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत होणार असल्याची माहिती मिळते, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महोत्सवाचे नियोजन कसे असेल याची आतुरता महोत्सव प्रेमींना लागली आहे.

लेखन – केवल

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments