नॉलेज

ATM वरील 16 आकड्यांची काय गरज? त्या मागील बँकांचा जुगाड तुम्हाला माहिती आहे का?

अनेकदा ऑनलाइन पेमेंट करताना आपल्याला डेबिट कार्ड वरील १६ अंकी आकडा विचारला जातो. पण आपल्या वापरात असलेल्या क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड वर असलेल्या १६ अंकांचा अर्थ आपल्याला माहिती आहे का?

भारताची वाटचाल ही कॅशलेस इकॉनमीकडे होत आहे. ‘Statista’ वेबसाइटच्या एका अहवालानुसार ऑगस्ट २०२० पर्यंत भारतात ५८ मिलियन क्रेडिट कार्ड वापरात होते. सर्व ठिकाणी कार्ड पेमेंट स्वीकारली जात असल्यामुळे रोख पैसे सोबत ठेवण्याऐवजी लोक कार्ड सोबत ठेवण्यात पसंती देताना दिसतायत. कोरोनाच्या काळात तर अनेक लोक रोख रक्कम ठेवण्याऐवजी ऑनलाइन पेमेंट अथवा कार्डने व्यवहार करण्यावर त्यांचा अधिक भर असतो. आता प्रत्येक दुकानामध्ये किंवा चहाच्या टपरीवर जरी गेलं तरी त्यांच्याकडे ऑनलाइन पेमेंट हा पर्याय उपलब्ध असतो. ( Why 16 digits on ATM? Do you know the juggling of those previous banks?)

अनेकदा ऑनलाइन पेमेंट करताना आपल्याला डेबिट कार्ड वरील १६ अंकी आकडा विचारला जातो. पण आपल्या वापरात असलेल्या क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड वर असलेल्या १६ अंकांचा अर्थ आपल्याला माहिती आहे का? याचा विचार देखील आपण केव्हा करत नाही.

आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहोत.

कार्डवरील पहिला अंक हे कार्ड कोणी जारी केले आहे हे सूचित करतो. या क्रमांकाला मेजर इंडस्ट्री आइडेंटिफायर म्हणून देखील ओळखले जाते. हे आकडे वेगवेगळ्या उद्योगांसाठी वेगवेगळे असतात.

पहिल्या अंकानंतरचे पुढील 5 अंक हे जारी करणाऱ्या कंपनीला सूचित करतात. याला इश्यू आयडेंटिफिकेशन नंबर असे म्हणतात.

उदा. मास्टरकार्ड- 51XXXX-55XXXX, व्हिसा- 4XXXXXXX

पुढील 9 अंक बँक खाते क्रमांकाशी जोडलेले आहेत. मात्र, हा क्रमांक तुमचा बँक खाते क्रमांक नसून त्याच्याशी जोडलेला एक नंबर असतो. त्याच वेळी, कार्डमध्ये नमूद केलेला शेवटचा क्रमांक हा चेक अंक म्हणून ओळखला जातो. हा अंक कार्डची वैधता दर्शवतो.

अनेकवेळा आपण याबद्दल माहितीही घेत नाही, तर ही दिलेली माहिती कशी वाटली जरूर कळवा… आणखी कोणत्या गोष्टीविषयी माहिती तुम्हाला हवी असेल तर आम्हाला कंमेंटमध्ये नक्की कळवा.

हे ही वाचा: 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments