मंत्रालय

किराणा मालाच्या दुकानात वाईन विकण्याची परवानगी का देण्यात आली? राज्यात दारूचा किती होतो खप? 

या निर्णयामागचं खरं कारण आहे ते म्हणजे द्राक्षे आणि सफरचंद वाईन उद्योगात बड्या मंडळींची असणारी गुंतवणूक आणि त्या तुलनेत राज्यातला वाईनचा असणारा अल्प खप.

सुपरमार्केट मध्ये वाईन विक्रीच्या परवानगीबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत जो निर्णय घेण्यात आला.  त्याबाबतची साधारण पहिली बैठक 24 मे 2021 ला झाली होती. त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी हा निर्णय घेण्यात आलाय. पण या निर्णयामागचं खरं कारण आहे ते म्हणजे द्राक्षे आणि सफरचंद वाईन उद्योगात बड्या मंडळींची असणारी गुंतवणूक आणि त्या तुलनेत राज्यातला वाईनचा असणारा अल्प खप.( Why is it allowed to sell wine in grocery stores? How much alcohol is consumed in the state? )

राज्याचे वाईन धोरण प्रामुख्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना फायदा व्हावा, तसेच, वाईन उद्योगास चालना मिळावी या हेतुने राबविण्यात येत आहे. वाईन उद्योगास चालना मिळण्यासाठी पर्यायाने शेतकऱ्यास त्याच्या मालास योग्य किंमत मिळण्याच्या दृष्टीने वाईन उद्योगाची वाढ तसेच, वाईनचे परिणामकारक वितरण होणे आवश्यक आहे. राज्यात सध्या फळे, फुले, केळी व मधापासून वाईन उत्पादित करण्यात येते.

ज्या वाईनरी वाईन तयार करतात व त्याबाबत वितरण करण्यास असमर्थ आहेत, अशा वाईनरींनी उत्पादित केलेली वाईन थेट सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉप या पद्धतीने विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा छोट्या वाईनरी घटकांना व पर्यायाने राज्यातील शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. अस राज्य सरकारचे म्हणणं आहे.

तर मिळालेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र दरवर्षी 35 कोटी लिटर देशी दारूचा खप आहे. 22 कोटी लिटर विदेशी दारूचा खप आहे तर 30 कोटी लिटर बियरचा खप आहे. त्या तुलनेत वाईन फक्त 70 लाखाचा खप आहे. म्हणजे वर्षाला एक कोटी लिटर देखील वाईनचा खप महाराष्ट्रात होत नाही. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे जवळपास 1 कोटींपेक्षा जास्त वाईन विक्री होईल अशी अपेक्षा सरकारला आहे.

आता या निर्णयाचा खरोखरच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का? या बैठकीत ठरल्याप्रमाणे वार्षिक दहा हजार लिटर आणि वार्षिक पंचवीस हजार लिटरच्या छोट्या वाईन उद्योगाना परवाने देण्याचं नव्या वाईन धोरणात निश्चित झालेलं असलं तरी तशा प्रकारचा जीआर अजून निघालेला नाही.

हे ही वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments