Women Powder Room : महिला मुंबईकरांसाठी गूड न्यूज, आणि मेट्रोवर मिळणार सगळ्या सुविधा…
या सेवेचे रविवारी रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खलिद यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. महिलांसाठीचे हे लाउंज 1000 चौरस फुटांचे आहे.

मुंबई मेट्रोच्या महिला प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावरील घाटकोपर मेट्रो स्थानकात महिला प्रवाशांसाठी 31 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून ‘पावडर रूम’ ची विशेष सुविधा सुरू होणार आहे. ( Women Powder Room : : Good news for women Mumbaikars, and all facilities available on Metro … )
या सेवेचे रविवारी रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खलिद यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. महिलांसाठीचे हे लाउंज 1000 चौरस फुटांचे आहे. सुरुवातीला एक महिना ही ‘पावडर रूम लाऊंजची सुविधा निशुल्क असणार आहे. त्यानंतर या सुविधेसाठी दिवसाला एक रुपयांप्रमाणे वर्षाला 365 रुपये द्यावे लागणार आहेत.
घाटकोपर मेट्रो स्थानकांतील पावडर रूम लाऊंजमध्ये महिला प्रवाशांना वाय-फाय, वातानुकुलित यंत्रणा, 8 स्मार्ट स्वच्छ, आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित अशी टॉयलेट,सॅनिटरी पॅडच्या डिस्पेन्सरची सुविधा असणार आहे. याशिवाय लहान मुलांचे डायपर बदलण्याची सोय आणि 14 आसनांचा एक कॅफे असणार आहे. या लाऊंजचा वापर करण्यासाठी त्यांना एक विशिष्ट ॲप डाउनलोड करावं लागणार आहे. मोफत सुविधा संपल्यानंतर, महिला प्रवाशांना एका वर्षासाठी सेवेची सदस्यता घ्यावी लागणार आहे. मेट्रो स्टेशनवर सकाळी 7 ते रात्री 09.30 या वेळेत उपलब्ध करून दिली जाईल.
हे हि वाचा: