फेमस

दादरमधून दिसणार समुद्राचा खतरनाक व्ह्यू; व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल

बृहन्‍मुुंबई महानगरपालिकेच्‍या जी उत्‍तर विभागाच्‍या वतीने दादर चौपाटी लगत अभिनव व आकर्षक व्ह्युवींग डेकची उभारणी करण्यात आली आहे.

Mumbai Tourist Places : बृहन्‍मुुंबई महानगरपालिकेच्‍या जी उत्‍तर विभागाच्‍या वतीने दादर चौपाटी लगत अभिनव व आकर्षक व्ह्युवींग डेकची उभारणी करण्यात आली आहे. पावसाचे पाणी वाहून समुद्रात नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याच्या मुखावर केवळ 10 महिन्यांचा कालावधीत उभारण्यात आलेल्या या आकर्षक, भव्य आणि विलोभनीय व्ह्युइंग डेकमुळे मुंबईकरांना आणि मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना एक अभिनव पर्यटन स्थळ उपलब्ध झाले आहे.

चैत्यभूमीजवळ असणाऱ्या या पर्यटन स्थळाचे नामकरण माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युवींग डेक असे असणार आहे. त्याचबरोबर या स्थळाच्या धर्तीवर मुंबईतील इतर ठिकाणी देखील व्ह्युइंग डेक उभारावेत असेही निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

दादर चौपाटी लगत उभारण्यात आलेल्या माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युवींग डेकची ठळक वैशिष्ट्ये

डेकची उंची समुद्रापासून सुमारे दहा फूट उंच आहे

डेकचे क्षेत्रफळ 10 हजार चौरस फूट आहे

डेकचे बांधकाम मार्च 2021 मध्ये सुरू झाले होते व केवळ दहा महिन्यांच्या विक्रमी कालावधीत या भव्य व देखण्या डेकचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.

डेकचे बांधकाम 26 पिलर्सवर करण्यात आलेले आहे.

डेकवर अत्याधुनिक व ऊर्जा बचत करणाऱ्या ‘एलईडी’ दिव्यांची आकर्षक प्रकाशयोजना करण्यात आली.

डेकवर एका वेळी 300 व्यक्ती उभ्या राहू शकतात.

डेकवर किमान 100 लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. यासाठी सदर ठिकाणी 26 बाक ठेवण्यात आले आहेत. तसेच 8 ठिकाणी वैविध्यपूर्ण आकाराची आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

पर्यावरण पूरकतेचा भाग म्हणून याठिकाणी विविध प्रकारची 130 झाडे लावण्यात आलेली आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments