
मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजेच शिवाजी पार्क येथे मधोमध कॉंक्रिटचा रस्ता बनवणार अशी चर्चा गेले अनेक दिवस सोशल मीडियावर होत आहे. तसेच यापुढे मैदानाचे भवितव्य काय? खेळाडू कुठे खेळणार आणि खेळताना कोणत्या समस्या उद्भणार ? या आणि असे अनेक प्रश्नांवर चर्चा होत आहे. तसेच खरंच आता शिवाजी पार्कच्या मधोमध माती उपसून खडी, दगड टाकायचे काम सुरू आहे त्यामुळे चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. यावर आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवाजी पार्क मैदानाला भेट दिली.
काही दिवसापासुन सोशल मिडीयावर शिवाजी पार्कच्या मधोमध परिसरामध्ये कॅान्क्रिटचा रस्ता बनवित असल्याची चुकिची माहिती पसरवली जात आहे. अशी माहिती महापौरांनी दिली.
सदर रस्ता हा मातीचा असुन त्या खाली पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी काम केले जात आहे. सदर पध्दत ही कुठल्याही आंतरराष्ट्रीय पध्दतीच्या मैदानामधील पाणी वाहुन नेण्याची व्यवस्था आहे. याच प्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंग च्या धर्तीवर आपण संपुर्ण शिवाजी पार्कामध्ये जमीनीखाली पाईपचे जाळे टाकले असुन पार्कातील नव्याने तयार केलेल्या 36 विहीरीमधुन गवतासाठी तसेच धुळ उडु नये यासाठी विहिरीतील पानी काढुन पार्क मधे मारलेलं पाणी तसेच पावसाचे पाणी निचरा होऊन विहीरींना पुनश्च मिळण्यास मदत होईल. कामाचे आराखडे जी/ऊत्तर कार्यालयात उपलब्ध असुन नागरीक ते कधीही पाहु शकतात. अस देखील महापौर म्हणाल्या.
सदर मैदानाच्या दैनंदिन देखभालीकरीता स्वतंत्र कंत्राटी संस्था नेमण्यात येणार असुन त्या करीता स्थानिक रहिवाश्यांची कमिटी बनविण्यात येईल जी पालिकेला सहकार्य करेल.