फेमस

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन…

मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांची हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्राणज्योत मावळली आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांची हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्राणज्योत मावळली आहे. नुकतेच 4 दिवसांपाहिला 30 जानेवारीला त्यांचा 93वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. निधनाची बातमी कळताच मराठी आणि हिंदी चित्रपसृष्टीतील दिग्गजांनी शोक व्यक्त केले आहे. ( Actor Ramesh Deo died at the age of 93 years… )

रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1929 साली महाराष्ट्राच्या अमरावतीमध्ये झाला. 1951 मध्ये त्यांनी ‘पाटलाची पोर’ या चित्रपटात भूमिका निभावून सिनेमासृष्टित पदार्पण केले. रमेश देव यांनी 190 मराठी चित्रपटांसह 285 हिंदी चित्रपटात कामे केले आहेत. 2010 साली त्यांनी ‘ गोष्ट लग्नानंतरची’ या मराठी चित्रपटाला दिग्दर्शनदेखील केले. रमेश देव यांनी 1971 साली रिलीज झालेल्या आनंद चित्रपटात दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना सोबत देखील काम केले आहे.

1962 साली रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांचा विवाह झाला. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटात एकत्र काम केले आहेत. मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीत नाम लौकिक करणारा अभिनेता अजिंक्य देव आणि सुप्रसिध्द दिग्दर्शक अभिनय देव दोन्ही रमेश देव यांची मुले आहेत.

हे हि वाचा:

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments