फेमस

Air India-Tata : एअर इंडियाचा जन्म कसा झाला, JRD टाटांचं पत्र का होतंय वायरल

आजच टाटा ग्रुपने एक जुने 1946 चे पत्र ट्वीट केले आहे. त्यामध्ये एअर इंडियाचा जन्म कसा झाला याबद्दलचे किस्से आहेत. आणि तेच पत्र 1946 मध्ये टाटा मासिक बुलेटिनमध्ये प्रकाशित झाले होते.

Air India-Tata : टाटा समूहाने 18000 कोटीची बोली लावून एअर इंडिया कंपनी विकत घेतली. असे असताना आजच टाटा ग्रुपने एक जुने 1946 चे पत्र ट्वीट केले आहे. त्यामध्ये एअर इंडियाचा जन्म कसा झाला याबद्दलचे किस्से आहेत. आणि तेच पत्र 1946 मध्ये टाटा मासिक बुलेटिनमध्ये प्रकाशित झाले होते.

टाटा कंपनीने तेव्हा एअर इंडियाच्या शिक्कामोर्तबासाठी कर्मचाऱ्यांमध्ये मतदान घेतले होते. त्यामध्ये कर्मचाऱ्यांनी 4 नावांमधून त्यांच्या आवडीच्या नावाला मत द्यायचे होते. एअर लाइन्स, एअर-इंडिया, पॅन-इंडियन एअर लाइन्स आणि ट्रान्स-इंडियन एअर लाइन्स अशी 4 नावे होती.

1946 मध्ये म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वी, एअरलाइन्सच्या नावावर झालेल्या मतदानाच्या पहिल्या फेरीत कर्मचाऱ्यांनी एअर-इंडियाला 64 मते, इंडियन एअर लाईन्सला 51 मते, ट्रान्स-इंडियन एअर लाईन्सला 28 मते आणि पॅन-इंडियन एअर लाईन्सला 19 मते असे मतदान केले होते.

मग दुसऱ्या फेरीत कमी मत मिळालेली नावे स्पर्धेतून बाद झाली. दुसऱ्या फेरीत फक्त एअर इंडिया आणि इंडियन एअर लाईन्स या दोघांसाठी मतदान घेण्यात आले. आणि या फेरीत एअर इंडियाला 72 मते तर इंडियन एअर लाईन्सला 58 मते मिळाली. मग टाटा कंपनीने एअरलाईन्सचे नाव एअर इंडिया ठेवले.
1932 मध्ये JRD टाटांनी एअर इंडियाला ‘एअरलाईन्स’च्या नावाने सुरू केले होते. 1946 मध्ये त्याचे नाव मतदानाद्वारे ‘एअर इंडिया’ ठेवण्यात आले.

स्वातंत्र्याच्यावेळी देशातील अनेक छोट्या मोठ्या 9 विमान कंपन्या होत्या. 1954 मध्ये सरकारने एअर इंडिया कंपनी टाटा कंपनीकडून विकत घेऊन त्याचे आणि त्या बाकीच्या विमान कंपनीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

देशांतर्गत सेवेसाठी इंडियन एअरलाइन्स आणि परदेशात एअर इंडिया या दोन कंपन्या स्थापन करण्यासाठी सर्व कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आले. 1953 पर्यंत, एअर इंडिया टाटा समूहाच्या मालकीची होती आणि तेव्हा अध्यक्ष JRD टाटा होते.

आता एअर इंडिया पुन्हा एकदा टाटाची कंपनी बनली आहे. गेल्या महिन्यातच यावर सोपस्कार पूर्ण झाले. टाटा समूहाचे म्हणणे आहे की ‘एअर इंडियाला पुन्हा लोकप्रिय बनवणे हे आपले पहिले प्राधान्य असेल’ असे टाटा समुहाने स्पष्ट केले आहे. टाटा समूहाला नाव आणि एअर इंडियाचा लोगो आणि नाव पुढील पाच वर्षे बदलता येणार नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments