टेक

30 Day Validity Plan : आता 28 नाही 30 दिवसांचा असणार रिचार्ज; मनसेची ‘ती’ भूमिका होती निर्णायक

महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने हे बदल करण्याची मागणी केली होती. त्याला अखेर मंजुरी मिळाली आहे.

30 Day Validity Plan : राज्यातील मोबाइल कंपन्यांकडून रिचार्जच्या नावे होणाऱ्या फसवणुकीला आता लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. महिनाभराचे रिचार्ज यापुढे 28 दिवसांऐवजी 30 दिवसांचे करण्याचे आदेश ट्रायने दिले असून लवकरच याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने हे बदल करण्याची मागणी केली होती. त्याला अखेर मंजुरी मिळाली आहे.

राज्यातील मोबाइल कंपन्यांकडून प्रीपेड मोबाइलचे महिन्याभराचे रिचार्ज करताना 30 दिवसांऐवजी 28 दिवसांचे करण्यात येत होते. साधारणतः 30 किंवा 31 दिवसांचा महिना असताना 28 किंवा त्यापेक्षा कमी दिवसांचे रिचार्ज करण्यात येत असल्याने या प्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष सतीश नारकर आणि उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी ट्रायकडे तक्रार केली होती. या रिचार्जच्या माध्यमातून मोबाइल ग्राहकांना वर्षभरासाठी तब्बल 28 दिवसांऐवजी आता होणार 30 दिवसांचे रिचार्ज सुरू करण्यात येणार आहेत.

पैसे पूर्ण भरून दिवस कमी असल्याने दिवसांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेच्या मागणीची गंभीर दखल घेत ट्रायने यासंदर्भातील आदेश मोबाइल कंपन्यांना आदेश दिले आहेत.

ट्रायने घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत. या निर्णयामुळे प्रीपेड मोबाइल ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ३० दिवसांऐवजी २८ दिवसांचे रिचार्ज करताना मोठ्या प्रमाणात ग्राहकांची लूट सुरू होती. आता ती थांबणार असून मोबाइल कंपन्यांनी लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. – अखिल चित्रे, मनसे नेते

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments