स्पोर्ट

पृथ्वी शॉ कॅप्टन तर अजिंक्य, तेंडुलकरचा सहभाग; मुंबईत रंगणार मोठे सामने

सलील अंकोला, गुलाम पारकर, सुनील मोरे, प्रसाद देसाई आणि आनंद याल्विगी यांचादेखील संघामध्ये समावेश असणार आहे.

Ranji Trophy 2022 : रणजी ट्रॉफीमध्ये 41 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईला सौराष्ट्र, गोवा आणि ओडिशासह ‘ड’ गटातून खेळण्यास संधी मिळाली आहे. हा संघ आपला साखळी सामना अहमदाबादमध्ये खेळणार आहे.

रणजी ट्रॉफी 2022 मध्ये खराब फॉर्ममध्ये असलेल्या अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळावं लागणार आहे. टीम इंडियाचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला मुंबईच्या रणजी संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. सलील अंकोला, गुलाम पारकर, सुनील मोरे, प्रसाद देसाई आणि आनंद याल्विगी यांचादेखील संघामध्ये समावेश असणार आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी फॉर्ममध्ये परतण्यासाठी रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला आउट ऑफ फॉर्म अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला दिला होता. पुजारा आणि रहाणेने दादाचे म्हणणे मान्य केले आहे. पुजारा सौराष्ट्रकडून तर रहाणे मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचाही (Arjun Tendulkar) मुंबई संघात समावेश असणार आहे.

मुंबईच्या निवड समितीने सचिन तेंडुलकरचा मुलगा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरचाही संघात समावेश केला आहे, या संघाची घोषणा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वेबसाइटवर करण्यात आली आहे.

असा असेल संपूर्ण संघ :

पृथ्वी शॉ (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, ड्र्यू गोमेल, अरमान जाफर, सर्फराज खान, सचिन यादव, आदित्य तारे, हार्दिक तामोरे, शिवम दुबे, अमन खान, शम्स मुलानी, तनुष कोटियन, प्रशांत सोळंकी, शशांक अत्तरडे, शशांक अत्तरकर, मोहित अवस्थी, प्रिन्स बदियानी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस आणि अर्जुन तेंडुलकर

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments