Student protest : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई महानगरचे मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस मध्ये आंदोलन
आज विद्यार्थी परिषद ने विद्यापीठाने फोर्ट कॅम्पसमध्ये आंदोलन केलं या मध्ये हॉस्टेल लवकरात लवकर चालू झाले पाहिजे. गेल्या 3 महिन्यापासून परिषदेने वेगवेगळ्या माध्यमातून विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देऊन ही आमची मागणी मान्य झाली नाही त्यामुळे परिषदेने आंदोलन केलं.

कोरोना महामारी मध्ये लॉकडाऊन झाल्यापासून सर्व महाविद्यालय आणि वसतीगृह बंद करण्यात आले होते. राज्य सरकार ने निर्बंध स्थिर केले असून आता सर्व महाविद्यालय व वसतीगृह सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत आणि त्याप्रमाणे महाविद्यालय सुरू ही झाले आहेत पण अजून सुद्धा मुंबई विद्यापीठाने विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे वसतीगृह सुरू केले नाहीत त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई महानगर ने मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस मध्ये आंदोलन केले व सोबत RLE व RPV विषयात ही लवकरात लवकर मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने तोडगा काढावे अशी मागणी अभाविपच्या शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठाकडे केली.
आज विद्यार्थी परिषद ने विद्यापीठाने फोर्ट कॅम्पसमध्ये आंदोलन केलं या मध्ये हॉस्टेल लवकरात लवकर चालू झाले पाहिजे. गेल्या 3 महिन्यापासून परिषदेने वेगवेगळ्या माध्यमातून विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देऊन ही आमची मागणी मान्य झाली नाही त्यामुळे परिषदेने आंदोलन केलं.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई महानगर मंत्री सुश्री गौतमी अहिरराव म्हणाल्या, ” मुंबई विद्यापीठाला वारंवार सांगून सुद्धा वसतीगृह सुरू केले नाहीत, आज आम्ही अभाविप म्हणून आंदोलन करून वसतीगृह सुरू केले पाहिजे व अन्य काही मागण्या कुलसचिव पुराणिक सर यांना भेटून सांगितल्या व त्यांनी आश्वासन दिले की त्वरित वसतीगृह सुरू करू व बाकीच्या विषयावर लवकरच तोडगा काडू. तोडगा निघाला नाहीतर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आशा इशारा अभाविपच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.