विद्यापीठ

मुंबईच्या ‘या’ कॉलेजने केली हिजाब बंदी? सांगितलं महत्त्वाचं कारण

Banned Hijab : कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाबच्या वादाचे पडसाद मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठेतरी पाहायला मिळतात. मुंबईतील एका कॉलेजमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. या कॉलेजने आपल्या नियमात ‘हिजाब, बुरखा, स्कार्फ’ आदी परिधान केलेल्या मुलींना कॉलेजच्या परिसरात प्रवेश नाकारला आहे. या गोष्टींमुळे गोंधळ उडाल्यानंतर कॉलेजने यावर आपलं स्पष्टीकरणही दिलं आहे.

मुंबईतील माटुंगास्थित एमएमपी शाह कॉलेजच्या वेबसाइटवर संबंधित उल्लेख केला होता. ‘कॉलेजची प्रतिष्ठा राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य कपडे घालणे गरजेचे आहे. कॉलेजच्या परिसरात ‘हिजाब, बुरखा, स्कार्फ’ परिधान करण्यास मनाई आहे. या नियमाबाबत आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आक्षेप घेत कॉलेजमधून हिजाबवरील बंदी हटवण्याची मागणी केली आहे.

कॉलेजच्या नियमाबद्दल गोंदळ वाढल्यानंतर कॉलेजच्या प्राचार्यांनी स्पष्टीकरण दिले. एमएमपी शहा कॉलेजच्या प्राचार्या लीना राजे यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितले की, आम्ही असे नियम नक्कीच बनवले आहेत, मात्र त्यांचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. हिजाब किंवा बुरख्याच्या नावाखाली समाजकंटक महाविद्यालयाच्या आवारात घुसून मुलींची छेड काढत असत. अशा परिस्थितीत कॉलेज कॅम्पसमध्ये येणाऱ्या व्यक्तीची ओळख असणे आवश्यक आहे. म्हणूनच चेहरा दाखवणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थी ओळखता येईल, अशी माहिती कॉलेजच्या प्राचार्यांनी दिली.

प्राचार्या लीना राजे म्हणाल्या की, महाविद्यालयातील सुमारे 50 टक्के विद्यार्थी मुस्लीम आहेत आणि अनेक कर्मचारी आणि प्राध्यापकही हिजाब घालून कामाला येतात आणि त्यांना कोणी अडवत नाही. कोणत्याही विद्यार्थिनीला हिजाब घालून कॉलेजमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले जात नाही. आम्ही त्यांना वर्गात हिजाब काढण्यास सांगतो किंवा त्यांची ओळख जाणून घेण्यासाठी त्यांचा चेहरा दाखवण्याचे आवाहन करतो. आम्हाला फक्त ती कॉलेजची विद्यार्थिनी आहे की नाही हे तपासायचे असते. असं मतही लीना राजेंनी मांडलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments