राजकारण

आमच्या जिवाची जबाबदारी राजकारणी घेणार का? अन्वय नाईक कुटुंबियांची ‘त्या’ वादात उडी

सध्या सुरू असलेल्या शिवसेना विरुद्ध भाजप या राजकीय वादात अन्वय नाईक हे सारख समोर येताना दिसत आहे. ठाकरे कुटुंबीय आणि अन्वय नाईक यांचे व्यवहार होते.

Anvay Naik Case : सध्या सुरू असलेल्या शिवसेना विरुद्ध भाजप या राजकीय वादात अन्वय नाईक हे सारख समोर येताना दिसत आहे. ठाकरे कुटुंबीय आणि अन्वय नाईक यांचे व्यवहार होते. हे व्यवहार चुकीच्या पद्धतीने झाले असल्याचे आरोप अनेकवेळा किरीट सोमय्या यांनी केले होते. गेल्या 1 वर्षापासून सोमय्या हे यावर बोलत होते. शांत झालेला मुद्दा कालच्या सेनेच्या पत्रकार परिषदेमुळे पुन्हा चर्चेला आला आहे. याबाबत आज देखील किरीट सौम्य5यांनी वक्तव्य केले. यावर नाईक कुटुंबीयांना भाष्य केले आहे. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी आम्ही पण फासावर लटकाव अशी किरीट सोमय्यांची इच्छा आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

अक्षता व आज्ञा नाईक म्हणाल्या की, आम्हाला काल (15 फेब्रुवारी) पत्र आलंय तुमची असलेली सुरक्षा काढून घेण्यात येत आहे. यात सुरक्षा काढून घेण्यामागचं कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही. आमच्या जीवाला धोका आहे. आम्हाला आतापर्यंत अनेक धमक्या आल्या आहेत. अस नाईक कुटुंब म्हणाले.

आमचा मानसिक छळ सुरू आहे

स्वतः किरीट सोमय्या यांना खुप सुरक्षा आहे. मात्र, हे लोक प्रत्येक वेळी जुन्या प्रसंगांची आठवण करून देतात. म्हणजे आम्ही पण फासावर लटकाव अशी सोमय्यांची इच्छा आहे का? जवळपास दीड वर्ष झालं आमचा मानसिक छळ सुरू आहे. आमच्या वैयक्तिक न्यायालयीन लढ्याला नेहमी राजकीय वळण का दिलं जातं हे कळत नाही. अशी प्रतिक्रिया नाईक कुटुंबीयांनी दिली आहे.

घरी आम्ही मायलेकी दोघीच असतो. हे राजकारणी लोकांना माहीत आहे, तरी सुद्धा कोणतंही कारण न देता आमची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. उद्या आमच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याची जबाबदारी हे राजकारणी घेणार का? असा सवाल नाईक कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा

एकाने मेमरीची घंटा वाजवली तर दुसरे म्हणतात मला बोलायला लावू नको !

राऊतानंतर आता BJP नेते म्हणतात, सलीम-जावेदची जोडी जेलमध्ये जाणार, अख्खा महाराष्ट्र पाहणार

माईक बंद करायचं संजय राऊत विसरले आणि त्यांची चर्चा आली समोर

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments