बीएमसी

निवडणूक येताच डबेवाला भवनाला मुहूर्त सापडला, शिवसेनेने बजेटही  केलं सादर

पालिकेच्या माध्यमातून वांद्रे येथे भव्य डबेवाला भवन उभारण्यात येणार आहे. यासाठी 286.27 चौरस मीटर जागाही उपलब्ध करण्यात आली आहे

Dabewala Bhavan : पालिकेच्या माध्यमातून वांद्रे येथे भव्य डबेवाला भवन उभारण्यात येणार आहे. यासाठी 286.27 चौरस मीटर जागाही उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अर्थसंकल्पीय भाषणप्रसंगी दिली. यामुळे शिवसेनेने निवडणुकीआधी दिलेल्या वचनाची पूर्तता झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आरोग्याला प्राधान्य आणि विकासाला गती देणारा 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प यावर्षी पालिका प्रशासनाने मांडला आहे. या माध्यमातून शिवसेनेने दिलेल्या वचनांची पूर्तता झाल्याचे यशवंत जाधव म्हणाले.

अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी प्रशासनाला अनेक महत्त्वपूर्ण सूचना करतानाच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहितीही दिली. मुंबई पालिकेत सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक केली जाते. मात्र त्या अतिरिक्त आयुक्तांना मुंबईचा आवश्यक तितका अभ्यास नसतो.

तसेच अतिरिक्त आयुक्त हे तीन वर्षांसाठी पालिकेत असतात. त्यामुळे त्यांचा फारसा फायदा होत नाही. मात्र पालिकेत सहायक आयुक्त, उपायुक्त अनेक वर्षांपासून कार्यरत असतात. मुंबईतील वातावरणाचा, परिसराचा, घडामोडींचा त्यांना अभ्यास असतो. त्यामुळे उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्यानाच पदोन्नती देत अतिरिक्त आयुक्त करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

शिवसेनेचे आभार!

मुंबई डबेवाला असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व मुंबईच्या महापौरांकडे डबेवाला भवनच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी डबेवाला भवनसाठी एच विभागात 286.27 चौ.मी. जागा देत असल्याचे जाहीर केले. डबेवाला भवनसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, यशवंत जाधव यांचे आभारी व्यक्त केले आहेत.

2021-22 च्या अर्थसंकल्पात 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती तरीही पालिकेने याकडे लक्ष दिले नव्हते, 2022 च अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर डबेवाले असोसिएशन कडून मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र पाठवण्यात आलं होतं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments