क्राईम

पोलिसांपासून वाचण्यासाठी अरुण गवळी महिलांच्या घोळक्यात लपायचा?

मुंबई पोलीस आणि अनेकांच्या नाकावर टिच्चून मुंबईमधील राजकारण आणि गुन्हेगारी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये जम बसवणारा अरुण गवळी हा एकमेव डॉन.

Arun Gawli Family : पोलिसांच्या खोट्या चकमकी आणि कारवाईपासून आपल्या पतीचे रक्षण करणे, आपल्या पतीने स्थापन केलेल्या पक्ष पुढे कसा वाढेल याचा विचार करणे, आपल्या पतीला खंबीरपणे पाठिंबा देणे, हे तीचं काम. मुंबई पोलीस आणि अनेकांच्या नाकावर टिच्चून मुंबईमधील राजकारण आणि गुन्हेगारी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये जम बसवणारा अरुण गवळी हा एकमेव डॉन. परंतु याच डॉनला पाठिंबा देणारी एक महिला म्हणजे झुबेदा मुजावर.

झुबेदा 17 वर्षाची असताना अरुण गवळीच्या संपर्कात आली. तिही भायखळ्यात राहायची. जुबेदाचं तेव्हा एका मुस्लिम धर्मीय मुलाशी लग्न ठरलं होतं, पण अरुण गवळीने मागणी घातल्यानंतर तिने मोठ्या आनंदाने होकार दिला. हिंदू महाराष्ट्रीय अरुण एका मुस्लिम मुलीबरोबर लग्न करतोय, या कल्पनेने अनेकजण कमालीचे चकित झाले होते. अरुण आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि अखेर त्यांनी जुबेदाशी लग्न केलं. लग्नानंतर धर्म बदलून झुबेदा मुजावर ही आशा गवळी झाली. तिच्या रूपाने दगडी चाळीतील त्याचं घर चालवणारी पत्नी तर मिळाली; पण एक विश्वासू भरवशाची सहकारी अरुण गवळीला मिळाली.

आशा आणि अरुण यांना पाच मुलं झाली. नवऱ्याच्या बेकायदेशीर कामांपासून आशा थोडीशी लांब राहिली. मुलांचे संगोपन, त्यांचे शिक्षण यामध्ये तिचा वेळ जायचा. अरुणची रक्तरंजित माफियागिरी वाढत होती. अरुणच्या कामामध्ये तिचा सहभाग नव्हता. परंतु अरुण वारंवार सरकारी पाहुणा म्हणून तुरुंगात जात असल्याने तिला बघ्याची भूमिका सोडून सूत्र चालवायची जबाबदारी उचलावी लागली. अरुण पोलिसांना केव्हाच भेटला नाही, आशाने चक्क घरात खड्डे खणले होते. असा उल्लेख एस. हुसेन झैदी यांच्या माफिया क्विन्स ऑफ मुंबई या पुस्तकात आहे. थोड्याच दिवसात आशावर अनेक जबाबदाऱ्या येऊ लागल्या. ती अतिशय आक्रमकपणे गँगची प्रकरणे सांभाळू लागली आणि भायखळावासियांसाठी आशाच्या रुपाने एक मम्मी मिळाली.

1997 मध्ये पत्नीच्या प्रोत्साहन आणि पाठिंब्याच्या आधारे अरुण गवळीने अखिल भारतीय सेना या पक्षाची स्थापना केली. तो स्वतः पक्षाध्यक्ष होता आणि अशा महिला शाखेची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आशावर आली. पोलीस चकमक आणि अटकेपासून वाचसाठी याच महिला शाखेचा वापर डॅडी ढालीसारखा करू लागला. दगडी चाळीतून बाहेर पडताना अरुणच्या सभोवताली कायम महिलांच्या गराडा असे. सदैव बायकांच्या घोळक्यात वावरतो, म्हणून इतर डॉन त्याची खिल्ली उडवत असत, पण हे डावपेच यशस्वी ठरले. एक म्हणजे बायकांच्या घोळक्यात लपलेला अरुण पोलिसांना दिसायचाच नाही, शिवाय महिलांवरील हिंसाचार करणे अशक्य असल्याने या दोन्ही कारणांमुळे तो अनेकदा पोलिसांच्या जाळ्यातून सहीसलामत निसटला होता. असा उल्लेख लेखक आणि पत्रकार एस. हुसेन झैदी यांनी लिहलेल्या माफिया क्विन्स ऑफ मुंबईमध्ये केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments