क्राईम

अरुण गवळी जेव्हा पत्रकाराला म्हणातो, ‘तू पार बूच लावलं मला’…

प्रकरण होतं शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलाकर जमसंडेकर यांच्या हत्येचं. जमसंडेकर यांची हत्या करण्यासाठी गवळीने मारेकरऱ्यांना तीस लाख रुपये दिल्याचा आरोप होता.

Arun Gawli History : ही कहाणी आहे 1996 सालची. त्यावेळेस मुंबईचे डॅडी म्हणजे अरुण गवळी औरंगाबादच्या तुरुंगात होता. तरुंगाचं नाव होतं हरसुल. प्रकरण होतं शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलाकर जमसंडेकर यांच्या हत्येचं. जमसंडेकर यांची हत्या करण्यासाठी गवळीने मारेकरऱ्यांना तीस लाख रुपये दिल्याचा आरोप होता. या आरोपाखाली न्यायालयाने गवळीला 20 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

या दरम्यान मुंबईतील पत्रकार, लेखक हुसैन झैदी यांनी अरुण गवळीची मुलाखत घ्यायचं ठरवलं. एस. हुसैन झैदी यांनी लिहलेल्या भायखळा ते बँकॉक या पूस्तकाच्या माध्यमातून ही कहाणी घेण्यात आली आहे.

झैदी जेव्हा औरंगाबादच्या हरसूल तुरुंगामध्ये डॅडीची मुलाखत घेण्यासाठी जातात, तेव्हा तिथला त्याचा रुबाब पाहून झैदीही आवाक होतात. तुरुंगात असूनही कडक इस्त्रीचा कुर्ता-पायजमा आणि नेहरू टोपी यामुळे डॅडीचा पेहराव जसा बाहेर होता, तसाच तो तुरुंगातही असल्याचं दिसून आलं. हुसैन झैदींनी पहिल्यांदा डॅडींना पाहिलं ते वयाच्या 26-27 व्या वर्षी. त्यावेळी मुंबईच्या डॉनची मुलाखत घेणे म्हणजे पत्रकाराचा मोठेपणा असल्यासारखाच होतं.

प्रश्नोउत्तरांचा वेळ सुरु झाला. मध्ये – मध्ये तिथले पोलीस येऊन वेळेची मर्यादा आणि वरिष्ठांबद्दलची माहिती देत होते. मात्र डॅडी त्यांच्यावर ओरडे, असं झैदी आपल्या पुस्तकातून सांगतात. अखेर मुलाखत झाली आणि ती इंडियन एक्सप्रेसच्या न्यूजलाईन पुरवणीवर छापून आली. छापून आलेल्या मुलाखतीची हेडलाईन होती (i will join politics to save myself from fake encounter says gawli from jail) “माझा बनावट पोलीस एन्काऊंटर होऊ नये म्हणून मी राजकारणात प्रवेश करत आहे, गवळीचे तुरुंगातून वक्तव्य”.

ही मुलाखत छापून आली आणि फक्त तुरुंगाच्या बाहेरच नाही, तर तुरुगांमध्येही अनेक आदलाबदल झाले. तिथे असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली, नवीन आलेल्या अधिकाऱ्यांनी डॅडीला त्रास देण्यास सुरुवात केली. तुरुंगाबाहेर हुसैन झैदींनाही पोलिसांनी धारेवर धरलं. गुन्हे शाखेच्या तेव्हाच्या सहआयुक्तांनी झैदींना चौकशीसाठी बोलवलं.

त्याच्या काही दिवसांनंतर डॅडी म्हणजेच अरुण गवळीला जामीन मिळाला. त्यानंतर पुन्हा काही विदेशी पत्रकारांसह एस. हुसैन झैदी डॅडीला भेटण्यासाठी दगडी चाळीत गेले. त्यावेळी डॅडीने झैदींना सगळ्यात महत्त्वाचं वाक्य म्हटलं,  ते म्हणजे ‘तू पार बूच लावलं मला’.

एक पत्रकार पोलिसांची सेक्यूरीटी भेदून तुरुंगात जातो, त्या तुरुंगात असलेल्या मोठ्या डॉनला भेटतो. तो डॉन एका खुणाच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेला असतो. हे सगळं असताना पोलिसांच्या सुरक्षिततेवर आणि त्यांच्या कर्तुत्वावर प्रश्न उभा राहतो. त्यावेळी ज्याने बातमी लिहली आणि ज्याच्याबद्दल बातमी आहे, अशा दोघांनाही धारेवर धरण्याचा प्रयत्न होतोच होतो.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments