आपलं शहर

Mumbai Dabevala : डबेवाला भवनाची मागणी मान्य होताच डबेवाला संघटनेची सरकारकडे आणखी एक मागणी

गेली १३० वर्ष मुंबईत जेवणाचे डबे पोहचवणारा डबेवाला आर्थीक क्षमता नसल्यामुळे मुंबईत आपले हक्काचे घर घेऊ शकले नाहीत.

मुंबई महानगर पालिकेच्या (Bruhnmumbai Corporation) माध्यमातून वांद्रे येथे भव्य डबेवाला भवन उभारण्यात येणार आहे. यासाठी 286.27 चौरस मीटर जागाही उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अर्थसंकल्पीय भाषणप्रसंगी दिली. यामुळे शिवसेनेने निवडणुकीआधी दिलेल्या वचनाची पूर्तता झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे डबेवाला भवन वांद्रे येथे उभारण्यात येणार आहे. डबेवाला भवनाची मागणी पूर्ण झाल्यावर मुंबई डबेवाला असोसिएशनकडून (Mumbai Dabevala Association) आणखी एक मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

गेली १३० वर्ष मुंबईत जेवणाचे डबे पोहचवणारा डबेवाला आर्थीक क्षमता नसल्यामुळे मुंबईत आपले हक्काचे घर घेऊ शकले नाहीत. त्यामुळे बहुतांश डबेवाल्यांना मुंबईत आपले स्व:ताचे घर नाही बरेचसे डबेवाले हे झोपडपट्टीत, भाड्याच्या खोलीत, गावकीच्या खोलीत, मंडळाच्या खोलीत राहत आहेत. या डबेवाल्यांना सरकारने अल्प दरात घरे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी डबेवाला संघटनाकडून केली आहे.

मुंबईतील गिरण्या बंद झाल्या. त्यामुळे मराठी गिरणी कामगार नामशेष झाला मुंबईतील गोदी, भाजी मार्केट, घाऊक बाजार मुंबई बाहेर गेले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील मराठी कामगार मुंबईतुन परागंदा झाले आहे. मुंबईतील अनेक व्यवसायही परप्रांतीयांच्या हातात गेलेले आहेत. विकासक, ठेकेदार, कुशल कामगार या क्षेत्रामध्येही बिगर मराठी माणसे मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत. आता मुंबईत 22 टक्के मराठी माणुस उरला आहे.

डबेवाला कामगार मुंबईच्या बाहेर घालवायचा नसेल तर त्याला सरकारने मुंबईमध्ये अल्प दरात घर उपलब्ध करून दिले पाहीजे. तरच तो मुंबई शहरात टिकून राहू शकतो. डबेवाल्यांना मुंबई मध्ये हक्काचे घर मिळाले पाहीजे. यासाठी 2004 साला पासून सरकार दरबारी डबेवाले सतत मागणी करत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. बैठकीत डबेवाल्यांना घरबांधणीसाठी भुखंड देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. अजूनही ते आश्वासन पूर्ण झालेले नाही.

विद्यमान उपमुख्यमंत्री पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न सुटला पाहीजे या बाबत मंत्रालयात बैठकी घेतल्या आहेत.

डबेवाल्यांना आशा आहे की महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Governmemt) कालावधीत डबेवाल्यांचा घरांचा प्रश्न नक्की सुटेल व डबेवाल्यांना मुंबईत हक्काचे घर मिळेल. अशी विनंती डबेवाला संघटनेकडून करण्यात आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments