क्राईम

नवऱ्याच्या मृत्यूचा बदला घेताना दाऊदचं साम्राज्य उद्धवस्त केलं, पण झालं भलतच…

अखेर दाऊदला मारण्याची योजना सपनाने बनवली ती 1990 मध्ये. शारजामध्ये भारत-पाकिस्तान सामन्यावेळी दाऊदला संपवण्याचा निर्णय पक्का केला होता.

Dawood History : गेल्या दोन आठवड्यापासून अंडरवर्ल्ड डॉन इब्राहिम दाऊद याच्या संबंध असलेल्या मालमत्तेवर ईडीने धाड सत्र सुरू आहे. ईडी दाऊदचे साम्राज्य आता उध्वस्त होत असली तरी एकेकाळी एका स्त्रीने हाच प्रयत्न केला होता, ती म्हणजे अशरफ.

अशरफला विचित्र हूर हूर लागली होती. वाईट स्वप्न पडल्याने तर सकाळी नेहमीपेक्षा लवकर जाग आली. स्वप्न नेमकं काय होतं हे व्यवस्थित आठवत नसलं तरी वाईट भावना मनात असल्याने भीती वाटत होती. विचार मनात सुरू होते तर दरवाजावर जोरदार थाप पडली. पोलिसांपासून ते गुंडापर्यंत अनेक जण दाराशी आतापर्यंत येत होते. का येतायत संबंध काय याबद्दल काहीही कल्पना नव्हती कोणालाही भेटायची इच्छा नसताना बाहेरुन आवाज आला की दुबईहून मेहमूद भाईचा फोन आला, लवकर चल, तो पुन्हा फोन करणार आहे.

मेहमूद भाई नाव ऐकताच मनातील हुरहूर कमी झाली. अशरफ फोनच्या दिशेने धावू लागली. थोडा वेळ थांबल्याने पुन्हा फोन आला. सुरवातीला आवाज स्पष्ट येत नव्हता, दुसऱ्यांदा फोन केल्यावर समोरून आवाज आला, “जान, आज संध्याकाळी मी परत येतोय”, एअरपोर्टला मला घ्यायला ये. अशरफ आनंदित होऊन घरी आली, तयारी करून एअरपोर्टला निघाली. आपला मेहमूद काय काम करतोय, याची चुणूकदेखील अशरफला नव्हती, पण पोलीस बघताच मेहमूदच्या रागाचा पारा चढायचा एवढच अशरफला माहीत होते.

अशरफ एअरपोर्टला पोहचली, जे होऊ नये ते झालं, एअरपोर्टला भली मोठी पोलिसांची फौज तैनात होती. बाहेर पडणाऱ्या लोकांमध्ये मेहमूद दिसतोय का, हे अशरफ मोठ्या आशेने पाहत होती. परंतु तेव्हा एअरपोर्टवर पोलिसांच्या जीप उभ्या होत्या, पोलीस मेहमूद स्वागतासाठी आले नसावेत, अशी ती मनोमन प्रार्थना करत होती. काळ्या रंगाचा, हट्टाकट्टा, डाव्या खांद्यावर बॅग अडकवलेली ती व्यक्ती दिसताच अशरफ आनंदाने हसली, तिचं थोडं दुर्लक्ष होताच मेहमूद दिसेनासा झाला आणि त्यावेळी तिथे गोळ्यांचा देखील आवाज झाला, लोकांमध्ये पळापळ सुरू झाली, अशरफला मेहमूद दिसेनासा झाला, त्याठिकाणी असलेल्या लोकांकडून कळलं की गोळीबारात जखमी झालेला माणसाला जवळच्या कूपर रुग्णालयात नेण्यात आले आहे. जे होऊ नये ते झालं होतं मेहमूदचा मृतदेह अशरफ समोर होता.

मेहमूदच्या कब्रस्तानच्या इथे अशरफला उस्मान नावाचा माणूस येऊन भेटला आणि म्हणाला, तुझ्या नवऱ्याला कोणी मारलं याची कल्पना मला आहे. तुझा आणि माझा शत्रू आता एकच तो म्हणजे दाऊद. दाऊदने दुबईत राहून पोलिसांना हाताशी घेऊन याचा खून केलाय. तुझ्या नवऱ्याने दाऊदच्या एका कामगीरीला नकार दिला असल्याने त्याला मारलं. नंतर कोणी नकार देऊ नये म्हणून दाऊदने हे केलं असावं.


याच वेळी अशरफने ठरवलं दाऊदचे साम्राज्य नेस्तनाबूत करून त्याचा जीव घेण्याचा निश्चय पक्का केला. आपण एकटे काही करू शकत नाही, आपल्याला कोणाची तरी मदत लागेल म्हणून अशरफने कब्रस्तानात भेटलेल्या हुसेन उस्तराची मदत घ्यायचं ठरवलं. हुसेन उस्तरा याच्या घरी अचानक अशरफ आली आणि म्हणाली मला हुसेन भाईने पाठवल आहे. मला दाऊदचा सूड घ्यायचा आहे. मला सर्व गोष्टींची ट्रेनिंग पाहिजे. दोघांनी ट्रेनिंगला सुरवात केली. उस्तराला वाटलं नव्हतं की एक मुस्लिम महिला एवढ्या लवकर सर्व काही शिकेल. ती शूट करण्यास तरबेज झाली. दोन महिन्यात दाऊदशी दोन हात करायला अशरफ सज्ज झाली. अशरफ आणि उस्तरा एकत्र काम करत असताना उस्तराला अशरफ आवडू लागली पण सांगण्याचे ध्येर्य त्याच्याकडे नव्हते.

दाऊदच्या मालकीचे जुगारी अड्डे, खंडणी उकळणे, डान्सबार बंद करण्यावर या दोघांनी जोर दिला. यामध्ये अशरफ अग्रस्थानी होती. जेवढ्या लवकर दाऊदचा भारतातील पैसा आणि हत्यार बंद होतील तेव्हढ्या लवकर त्याच्याजवळ जाऊ असा समज अशरफचा होता. तिने नेपाळवरून येणारी दाऊदची हत्यारांवर देखील हल्ले करून कब्जा मिळवला. हे काम करताना अशरफ आणि उस्तरा आणखी जवळ येऊ लागले आणि उस्तराचा तोल सुटला या दिवसापासून दोघांनी भेटणं बंद केलं, यावेळी अशरफ मात्र एकटी दाऊदच्या टोळींशी दोन हात करत होती. दाऊदला मारणे हे आपलं स्वप्न असल्याने अशरफने आपलं नाव सपना ठेवलं होतं. अनेक गँगस्टरशी व्यवहार याच नावाने करत होती. ओळख लपवून दाऊदच्या अनेक व्यवसायाची माहिती पोलिसांना कळली होती, यातून तिला पैसा मिळत होताच, त्याचप्रमाणे दुष्मणाला संपवण्यासाठी जवळ जात होती.

अखेर दाऊदला मारण्याची योजना सपनाने बनवली ती 1990 मध्ये. शारजामध्ये भारत-पाकिस्तान सामन्यावेळी दाऊदला संपवण्याचा निर्णय पक्का केला होता. पूर्ण स्टेडियमचा नकाशा तयार होता. पण सपनाच्या जवळच्याने तिचाच घात केला असा उल्लेख पत्रकार आणि लेखक एस. हुसेन झैदी यांनी लिहलेल्या ‘माफिया क्विन्स ऑफ मुंबई’मध्ये आहे. शेवटी दाऊदला याची खबर लागल्याने सपनाचा देखील काटा काढण्यात दाऊद यशस्वी झाला होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments