हेल्थ

Weather : मुंबईतील हवेची गुणवत्ता सलग तिसऱ्या दिवशी खराब….

मुंबईतील हवेची गुणवत्ता रोज तपासली जाते. तसेच आज सलग तिसऱ्या दिवशी हवेची गुणवत्ता खराब दिसण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे धुळीच्या वादळाची हालचाल. मागील दोन दिवसाची हवेची गुणवत्ता खराब होती, सोमवारी 318 तर मंगळवारी 320 नोंदविले गेले.

Weather : मुंबईतील हवेची गुणवत्ता रोज तपासली जाते. तसेच आज सलग तिसऱ्या दिवशी हवेची गुणवत्ता खराब दिसण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे धुळीच्या वादळाची हालचाल. मागील दोन दिवसाची हवेची गुणवत्ता खराब होती, सोमवारी 318 तर मंगळवारी 320 नोंदविले गेले. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि राजस्थानच्या सीमेवर 3 फेब्रुवारीला धुळीचे वादळ आले होते. त्याचबरोबर मुंबईतही हवे थंड असून तिचा वेग मंदावला आहे, त्यामुळे कण हवेतच अडकले आहेत.

मागील महिन्यात आलेल्या वादळाचा परिणाम राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राला पण झाला आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वायू गुणवत्ता (SAFAR) नुसार, दुपारी 1.30 वाजता AQI हा दिल्ली, पुणे आणि अहमदाबादपेक्षाही मुंबईचा अत्यंत खराब होता.

8 फेब्रुवारीला म्हणजेच काल मुंबईत थंडीचे वातावरण होते. कालचे तापमान किमान 17.8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर आज मुंबईत तापमान कमाल 30 आणि किमान 21 अंश सेल्सिअस असू शकल्याचा अंदाज आहे. तसेच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रातील तापमान कमाल 28 तर किमान 22 अंश सेल्सिअस असेल. मात्र 15 फेब्रुवारीनंतर थंडी कमी होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments