कारणसमाजकारण

वर्तमानपत्रांतून अन्नपदार्थ गुंडाळून देत असाल तर तुमचा ठेला गुंडाळण्याची वेळ येईल, वाचा ही बातमी !

अन्न आणि औषध प्रशासनाने वर्तमापत्राद्वारे अन्नपदार्थ देण्यास बंदी घातली आहे.

मुंबई : अन्नपदार्थ रस्त्यावर किंवा उघड्यावर वर्तमानपत्रातून विकले जात असतील तर, आता त्यावर चपराक बसणार (Banned Food In Newspaper) आहे. अन्न व औषध प्रशासनाने आता कारवाईला सुरुवात केली आहे. कोणत्याही अन्न पदार्थाला आता वर्तमानपत्रातून विकण्याला अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त श.रा.केंकरे यांनी राज्यभरात कुठेही अन्नपदार्थ विकताना वर्तमापत्राचा वापर करण्यात आला तर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

वर्तमानपत्रातून दिलेल्या अन्नावर कारवाई का होणार?  

जेव्हा अन्नपदार्थ वर्तमापत्राद्वारे दिले जातात, त्यावेळी वर्तमानपत्रातील छपाईसाठी वापरलेली शाई एकमेकांत मिसळली जाते. ती शाई आरोग्यास हानिकारक ठरते. आतापर्यंत आलेल्या अहवालातून अनेक डॉक्टरांकडून हे सांगण्यात आले आहे. माणसाच्या अनेक आजारांना वर्तमान पत्रातील शाई निमंत्रण देऊ शकते. याच सवयींपासून परावृत्त होण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. तसेच, वर्तमानपत्रातील शाईमध्ये मॅटल आणि कार्बनचा समावेश असतो. दोन्हींचे प्रमाण अत्यल्प असले तरी सतत वर्तमानपत्रात बांधलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने डायरिया किंवा किडनीचे विकार होण्याची जास्त शक्यता वर्तविली जाते. त्यामुळे, अन्नपदार्थ रस्त्यावर, उघड्यावर किंवा फेरीवाल्यांकडून विकताना वर्तमान पत्रात देऊ नये, अन्यथा सक्त कारवाई होईल असा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे.

वर्तमानपत्रांऐवजी बटर पेपरचा वापर करा 

भंगारातून कमीत-कमी किंमतीत वर्तमानपत्रे विकत घेऊन अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी वापरली जातात. मात्र ती धोकादायक असल्याने त्यावर अन्न आणि औषध प्रशासना कडून बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी अन्नपदार्थ गुंडाळून देण्यासाठी बटर पेपरचा वापर करावा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments