बीएमसी

Double Decker Scam : मुंबईत बेस्ट बसचा डबल डेकर घोटाळा; नेमका फायदा कोणाला?

बसगाड्यांची संख्या वाढविल्यानंतर कुठल्याही प्रकारची नवीन निविदा प्रक्रिया न राबवता  200 बसगाडयांच्या निविदेसाठी आलेला प्रति किलोमीटर 56.40 रुपयांच्या दरातच 900 बसगाड्या पुरविण्याचे कंत्राट देऊ केले आहे.

बेस्टच्या ताफ्यात 200 दुमजली इलेकट्रीक बसगाड्यांचा प्रस्ताव आणून प्रत्यक्षात बेस्ट समितीने मे कोसिस ई मोबिलिटी प्रा. लि. आणि मे स्विच मोबीलिटी ऑटोमोटिव्ह या व्यवसाय संस्थांना भाडेतत्त्वावर परस्पर 900 बसगाड्यांचा पुरवठा करण्याची मुभा दिली आहे. बसगाड्यांची संख्या वाढविल्यानंतर कुठल्याही प्रकारची नवीन निविदा प्रक्रिया न राबवता  200 बसगाडयांच्या निविदेसाठी आलेला प्रति किलोमीटर 56.40 रुपयांच्या दरातच 900 बसगाड्या पुरविण्याचे कंत्राट देऊ केले आहे. यामुळे पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीतल्या ठेकेदाराला खुश करण्यासाठी सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप मनसे नेते केतन नाईक यांनी केला आहे. (Best bus double decker scam in Mumbai Who exactly benefits)

दरम्यान, या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ जनरल मॅनेजर लोकेश चंद्रा यांना भेटलं. यावेळी लोकेश चंद्रा यांनी नवीन टेंडर आणल्याने बेस्टचं नुकसान होऊ शकतं म्हणून परस्पर काम दिल्याचे सांगितले. परंतु मुळात बेस्ट समिती अशा प्रकारचा बेकायदेशीर आणि भविष्यातील निविदा प्रक्रियांना छेद देणारा निर्णय कसा काय घेऊ शकते हा प्रश्न उपस्थित केला.

काय म्हणाले केतन नाईक?

200 व्यतिरिक्त इतर बसगाड्यांचा खर्च पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र शासनाच्या विभागाकडून देण्यात येणार असला तरी हा निधी कुठल्याही निविदा प्रक्रियेविना परस्पर वापरण्याचा घाट त्यांच्याच पक्षाच्या बेस्ट समितीने घातला आहे. जनतेच्या करातून उत्पन्न झालेल्या निधीचा असा गैरवापर मनसे कदापी खपवून घेणार नाही, असे शिष्टमंडळाचे लोकेश चंद्रा यांना सांगितले असून निवेदनानंतरही बेस्ट प्रशासनाने निविदा प्रक्रियेतील त्रुटी दूर न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन उभारेल आणि सोबतच लोकायुक्त आणि कोर्ट याठिकाणी देखील दाद मागेल अशी माहिती केतन नाईक यांनी दिली.

हेही वाचा :

आर्थिक बजेट म्हणजे नक्की काय? ही माहिती कधी वाचली नसेल?

सर्वाधिक अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावे?

पेंग्विनच्या प्रेमावरून किशोरी पेडणेकर आणि चित्रा वाघ पुन्हा भिडल्या

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments